Lokmat Sakhi >Beauty > उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

Home Remedies For Cracked Heel: उष्णतेमुळे तळपायाला किंवा टाचेला भेगा पडल्या असतील तर हा घरगुती उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 01:26 PM2024-04-21T13:26:43+5:302024-04-21T13:27:59+5:30

Home Remedies For Cracked Heel: उष्णतेमुळे तळपायाला किंवा टाचेला भेगा पडल्या असतील तर हा घरगुती उपाय करून पाहा...

Home remedies for cracked heel, how to cure cracked heel due to body heat, skin care tips for summer | उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

Highlightsतुमच्याही तळपायांना खूप भेगा पडल्या असतील तर त्या कमी करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा.

सध्या उन्हाळ्याचा कडका इतका वाढला आहे की तो अनेकांना सोसत नाहीये. त्यामुळेच तर हातापायांची आग होणे, गळून गेल्यासारखं वाटणे, तळहाताची सालं निघणे, टाचांना भेगा पडणे, असा त्रास अनेकांना होत आहे. हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये तळपायांच्या भेगा वाढतात. हिवाळ्यात त्वचेच्या कोरडेपणामुळे तर उन्हाळ्यात अंगातल्या उष्णतेमुळे हा त्रास होतो (how to cure cracked heel due to body heat). तुमच्याही तळपायांना खूप भेगा पडल्या असतील तर त्या कमी करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. (skin care tips for summer)

 

तळपायांच्या भेगा कमी करण्यासाठी उपाय

तळपायांच्या भेगा कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा याची माहिती beautysecretsreveal या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

शरीरात झालेले ४ बदल सांगतात डायबिटीसची लक्षणं- साधे वाटणारे हे धोकादायक बदल लगेच ओळखा

यामध्ये असं सांगितलं आहे की एका वाटीत टुथपेस्ट, तांदळाचं पीठ, लिंबाचा रस आणि ग्लिसरीन हे सगळं एकसारख्या प्रमाणात घेऊन व्यवस्थित एकत्र करा.

त्यानंतर पाय धुवून घ्या आणि त्यावर ही पेस्ट लावा. एखाद्या जुन्या झालेल्या टुथब्रशने तळपाय घासून काढा. १० ते १२ मिनिटे तळपाय घासल्यानंतर धुवून घ्या आणि त्याला माॅईश्चरायझर लावा. टाचेवरच्या भेगा बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या असतील. 

 

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे उपायही करून पाहा

तळपायाला जर उष्णतेमुळे भेगा पडल्या असतील तर त्या कमी करण्यासाठी तुमच्या आहारात जास्तीतजास्त थंड पदार्थ घ्या. जेणेकरून अंगातली उष्णता कमी होण्यास मदत होईल.

भरपूर पाणी किंवा लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, ताक प्या. यामुळे हायड्रेशन होणार नाही.

नवऱ्यासोबत असतानाही आमिर खानच्या लेकीला छळतोय एकटेपणा, इरा म्हणाली खूप भीती वाटते कारण.....

तळपायांना मेहेंदी लावून रात्रभर ठेवा. मेहेंदी थंड असल्याने अंगातली उष्णता कमी होण्यास मदत होते.

सध्या कलिंगडाचे दिवस आहेत. कलिंगड कापल्यानंतर त्याच्या सालांचा जो पांढरा भाग असतो, त्यावर तळपाय ठेवा. पायांना एकदम थंड वाटेल आणि शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.

 

Web Title: Home remedies for cracked heel, how to cure cracked heel due to body heat, skin care tips for summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.