Lokmat Sakhi >Relationship > चहलने धनश्रीला कशाला द्यायला हवी पोटगी? कायदा म्हणतो, घटस्फोट घेताना बायको कमावती असेल तरीही...

चहलने धनश्रीला कशाला द्यायला हवी पोटगी? कायदा म्हणतो, घटस्फोट घेताना बायको कमावती असेल तरीही...

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: चहलने धनश्रीला कशाला द्यायला हवी पोटगी? या प्रश्नाचं उत्तर, कायदा काय सांगतो यावर अवलंबून आहे..

By रुचिका पालोदकर | Updated: March 21, 2025 18:25 IST2025-03-21T18:03:12+5:302025-03-21T18:25:43+5:30

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: चहलने धनश्रीला कशाला द्यायला हवी पोटगी? या प्रश्नाचं उत्तर, कायदा काय सांगतो यावर अवलंबून आहे..

Family Court grants divorce to Yuzvendra Chahal and Dhanashree Verma, Chahal is required to pay alimony of ₹4.75 crores  | चहलने धनश्रीला कशाला द्यायला हवी पोटगी? कायदा म्हणतो, घटस्फोट घेताना बायको कमावती असेल तरीही...

चहलने धनश्रीला कशाला द्यायला हवी पोटगी? कायदा म्हणतो, घटस्फोट घेताना बायको कमावती असेल तरीही...

Highlightsपोटगी द्यायची की नाही हे ठरविण्यासाठी पत्नी कमावती आहे की नाही एवढाच मुद्दा विचारात घेणे योग्य नाही. दोघांच्याही परिस्थितीचा सारासार विचार गरजेचाच आहे.

रुचिका सुदामे- पालोदकर

क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने घटस्फोट घेताना धनश्री वर्माला सुमारे ५ कोटी रुपये पोटगी दिली. याचीच सोशल मीडियात चर्चा आहे. कुणी म्हणतंय की धनश्री जर कमावती आहे तर गरज काय त्यानं तिला पोटगी देण्याची! आणि तिथून सुरु झालेली चर्चा इथवर पाेहोचली आहे की जर बायको कमावती असेल तर नवऱ्यानं तिला पोटगी देण्याची गरजच काय.. त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं. नातं तुटताना पैसे मागायची काय गरज आहे?(Family Court grants divorce to Yuzvendra Chahal and Dhanashree Verma)

 

एकमेकांसोबत नाही पटलं तर सरळ घटस्फोट घेऊन मोकळं व्हायचं.. लग्नानंतर २ वर्ष काय ६ महिन्यातही घटस्फोट हाेताना आता दिसतात. त्यामुळेच तर बी टाऊनमध्ये एका नंतर एक लग्न मोडल्याच्या बातम्या सतत कानावर येतात. फक्त सेलिब्रिटींच्या बाबतीतच नाही तर सर्वसामान्य कुटूंबामध्येही घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. अर्थात ही बाब वरवर दिसते तेवढी साधी नसतेच. कारण त्यामुळे घटस्फोट घेणारे नवरा- बायको आणि त्यांचे कुटुंबीय अशा सगळ्यांनाच खूप शारिरीक, मानसिक त्रास होतोच. त्यात आता आर्थिक त्रासाचाही उल्लेख करायलाच हवा. कारण घटस्फोट झाला की सगळ्यात आधी पत्नीला पोटगी देण्याची व्यवस्था करावी लागते. या पोटगीचे आता नुकतेच समोर आलेले उदाहरण म्हणजे क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा झालेला घटस्फोट.

 

वांद्रे येथील कुटूंब न्यायालयात त्यांचा घटस्फोट झाला आणि चहलने धनश्रीला एकूण ४ कोटी ७५ लाख रुपयांची पोटगी देण्याचे मान्य केले. यापैकी २ कोटी ३७ लाख रुपये त्याने आतापर्यंत दिलेलेही आहेत. त्यावरुनच सोशल मीडियात मोठी चर्चा रंगली की धनश्री काही अबला नारी नाही. ती स्वत: उत्तम कोरिओग्राफर असून कमावती महिला आहे. तिला पोटगीची काय गरज? कमावत्या पत्नीला एवढ्या मोठ्या रकमेच्या पोटगीची गरज असते का?

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

कायदा काय सांगतो?

याविषयी ॲड. अर्चना गोंधळेकर सांगतात की, कमावत्या महिलेला पोटगी द्यावी की नाही हे ठरवताना कोर्टाला अनेक गोष्टींची पडताळणी करावी लागते. फक्त ती कमावती आहे की नाही यावरून निर्णय होत नाही. उदाहरणार्थ जर एखादी महिला अतिशय सधन घरातली आहे, तिला नोकरी करण्याची गरज नाही. पण केवळ वेळ जावा म्हणून किंवा आवडते म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ती कमी पगाराची नोकरी करते आहे.

वाट्यांचं मंगळसूत्र नेहमीचंच, आता घ्या नव्या फॅशनचं टेम्पल डिझाईन मंगळसूत्र, १० सुंदर डिझाईन्स

जर याच महिलेचा पुढे जाऊन घटस्फोट झाला तर मात्र तिला मिळणारा पगार तिच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पुरेसा नाही. तर त्या प्रकरणामध्ये ती स्त्री कमावती असली तरीही तिच्या पतीला तिला पोटगी द्यावीच लागेल. कारण तिला मिळणारा पैसा तिचा खर्च भागविण्यासाठी पुरेसा नाही. पाेटगी देण्याचा उद्देश एवढाच असतो की पत्नी पतीपासून वेगळी झाली तरी तिला ती विवाहित असताना जशा परिस्थितीत राहता यायचे, तशाच परिस्थितीत घटस्फोट झाल्यानंतरही राहता यावे. मुळाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोटगी ही अवलंबून असलेल्या जोडीदाराला मदत करण्यासाठी असते. दुसऱ्या पक्षाला शिक्षा करण्यासाठी नाही.

 

आता कमावत्या पत्नीचे आणखी एक उदाहरण पाहूया.. जर नवरा- बायको दोघांनाही एकसारखाच पगार मिळतो म्हणजेच दोघांची आर्थिक स्थिती सारखीच आहे तर त्याठिकाणी पत्नीला पोटगी नाकारली जाऊ शकते. पण पुन्हा एकदा इतरही मुद्दे विचारात घेतले जातात.

कोलेस्टेरॉल आणि शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टर सांगतात ४ उपाय, सोपं काम करते जादू

ते म्हणजे दोघांना किती मुले आहेत, त्यांची वयं काय, मुलांची कस्टडी कोणाकडे असणार आहे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च किती असताे, दोघांच्या नावे काही संपत्ती, गुंतवणुकी आहेत का असे सगळे विचारात घेऊन पुन्हा पोटगी द्यायची की नाही यावर विचार केला जातो. त्यामुळे पोटगी द्यायची की नाही हे ठरविण्यासाठी पत्नी कमावती आहे की नाही एवढाच मुद्दा विचारात घेणे योग्य नाही. दोघांच्याही परिस्थितीचा सारासार विचार गरजेचाच आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदा काय, समाजनियम काय हे समजूनच भाष्य करणं योग्य, नाही का?

 

Web Title: Family Court grants divorce to Yuzvendra Chahal and Dhanashree Verma, Chahal is required to pay alimony of ₹4.75 crores 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.