lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > ....म्हणून लैंगिक असमाधानानं मोडतात संसार! रोजची भांडणं, वाद हे सारं कशानं होतं?

....म्हणून लैंगिक असमाधानानं मोडतात संसार! रोजची भांडणं, वाद हे सारं कशानं होतं?

Benefits of Sexual Communication : मनमोकळा संवाद नसेल तर जोडीदार परस्परांना केवळ दोष देतात आणि लैंगिक असामधानाचा परिणाम मानसिक-शारीरिक स्वास्थ्यावरही होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:20 PM2022-07-04T19:20:06+5:302022-07-05T12:03:14+5:30

Benefits of Sexual Communication : मनमोकळा संवाद नसेल तर जोडीदार परस्परांना केवळ दोष देतात आणि लैंगिक असामधानाचा परिणाम मानसिक-शारीरिक स्वास्थ्यावरही होतो.

Benefits of Sexual Communication : Good Sex Starts With Good Communication Benefits of Having & Talking about Sex | ....म्हणून लैंगिक असमाधानानं मोडतात संसार! रोजची भांडणं, वाद हे सारं कशानं होतं?

....म्हणून लैंगिक असमाधानानं मोडतात संसार! रोजची भांडणं, वाद हे सारं कशानं होतं?

'मनातलं बोललं सगळं तर तिला आवडेल का, ती किंवा तो काय विचार करेल?' असा विचार करून खूप गोष्टी मनातच ठेवल्या जातात. अनेक नवविवाहित जोडपी किंवा नुकतेच रिलेशनशिपमध्ये आलेले कपल्स वरवर पाहता खूष दिसत असली तरी नाजूक विषयांवर एकमेकांशी बोलतच नाहीत. (Relationship Tips) त्यांच्यातल्या संवादाच्या अभावानं मनात धुसफूस सुरू असते. (The Role of Sexual Communication) भलत्याच कारणावरुन चिडचिड असते पण स्पष्ट न बोलल्यानं सतत वाद-भांडणं वाढत जातात. यासाऱ्याचा थेट परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावर आणि त्यामुळे नात्यावरही होतो. जर परस्परांशी मोकळा संवाद असेल तर लैंगिक सुखासह दोघांचंही लैगिंक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहू शकतं असं तज्ज्ञ सांगतात. मात्र तेच होत नसल्यानं अनेक जोडप्यांच्या आयुष्यात आज बऱ्याच समस्या दिसतात. (How can I improve sex communication)

लैंगिक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात , ''शारीरिक संबंधांमध्ये आपल्याला काय हवंय, काय नकोय. कोणत्या गोष्टी खूप आवडतात याबाबत दोघांनीही मोकळेपणानं बोलावं. कारण एखाद्याला संबंधादरम्यान एखादी गोष्ट खूप आवडते तर दुसऱ्याला तिटकारा वाटतो. संबंधादरम्यान एखादी गोष्ट हवी असेल तर हे पार्टनरला सांगितल्याशिवाय त्याला कळायला मार्ग नसतो. आपल्या पार्टनरला न सांगताच सगळं कळावं किंवा त्यानं समजून घ्यावं अशी अनेकांची भावना असते पण तुमचा पार्टनर मनकवडा किंवा माईंड रिडर नाहीये. त्यामुळे हव्या त्या गोष्टी स्पष्टपणे बोलणं उत्तम. (Good Sex Starts With Good Communication)

उदा. एखाद्या भेळवाल्याकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार सुकी भेळ, कांदा नसलेली भेळ, तिखट भेळ बनवा असं सांगतो. आपण जर भेळवाल्याला काहीच सांगितलं नाही तर तोच भेळवाला त्याच्या मनाने जी भेळ बनवेल ती एखाद्या तिखट लागू शकते किंवा एखाद्या गोड लागू शकते. उदाहरण साधं असलं तरी यातून बोध हाच घ्यायचा की आपल्याला काय हवंय, काय अजिबात आवडत नाही, स्वीकारणार नाही हे स्पष्ट सांगणं महत्वाचं आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असल्यास तुम्ही पार्टनरला आधीच याची कल्पना दिली तर त्याचा फायदा होईल. कारण नंतर चिडचिड करण्यात काहीच अर्थ नसतो.''

लैगिंक संबंधात सुसंवादाचे महत्त्व काय? ( Most Important Talks for a Great Sex Life)

डॉ. भोसले म्हणतात, ''दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा सुसंवाद महत्वाचा असतो. उदा. जेवणात कोणत्या प्रकारचं जेवण कोणाला आवडतं याची कल्पना दिल्यास जेवण चांगलं बनतं. त्याचप्रमाणे शरीरसंबंधातही आवडी निवडी स्पष्टपणे सांगाव्यात. नुसतं शरीर सुदृढ असून उपयोग नाही तर संवाद महत्वाचा. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे ज्याला भाषा आहे. आपलं प्रेम, विचार, विचारातील प्रखरता आपण भाषेतून व्यक्त करू शकतो. म्हणून चांगल्या नातेसंबंधांसाठी भाषेच्या देणगीचा वापर करायला हवा. तुम्हाला काय हवंय ते बोलून दाखवा.''

लैंगिक संबंध आणि मनाचे खेळ

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, ''कामेच्छा ही मनावर पगडा बसवणारी आहे. कामेच्छेचा विचार येताच आकर्षण निर्माण होतं आणि संभोग करण्याची इच्छा होते. लैगिंक संबंध घडण्याकरता वातावरण पोषक असावं लागतं, जवळीक असावी लागते. स्त्री आणि पुरूष दोघांनाही सुख देण्यात आणि घेण्यातही आनंद वाटत असतो. ही भावना पुरक आहे. हे स्वरूप कळलं नाही तर फक्त देणारा आणि घेणारा अशी स्थिती निर्माण होते. म्हणून संवाद महत्वाचा आहे. ज्या व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवायचे आहेत त्याची मनस्थिती खुलवणं, तिला आनंद देणं, उत्सुकता वाटू देणं, विश्वास निर्माण करणं हे संवादातून साधता येतं.

पुरेसा संवाद नसेल तर लैगिंक संबंध फारसे आनंददायी ठरू शकत नाहीत. लैगिंक संबंधात अवयवांचा स्पर्शं हाच खरा संवाद असतो आणि लैगिंक संबंधात समाधान न मिळाल्यानं मनात तेढ निर्माण होते. संबंधादरम्यान आपल्यालाही आनंद मिळू शकतो याची अनेक स्त्रियांना कल्पनाही नसते. म्हणूनच परस्पर पुरकतेची कल्पना असणं आणि मनमोकळा संवाद उत्तम नाते संबंधांसाठी महत्वाचा असतो.''

Web Title: Benefits of Sexual Communication : Good Sex Starts With Good Communication Benefits of Having & Talking about Sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.