Join us

आधी घटस्फोट नंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न; लग्नाच्या चार महिन्यानंतर म्हणाली, 'माझ्या आयुष्यात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 12:36 IST

Actress mahalakshmi expresses her love for husband ravindar chandrasekaran : रविंद्र  चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) तमिळ चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.

दक्षिण भारतीय अभिनेत्री  महालक्ष्मी कायम तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत असते. महालक्ष्मीनं दुसरं लग्न निर्माता रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबत केलं. महालक्ष्मी पती रविंद्र चंद्रशेखरन यांच्यासोबतच्या फोटोजमुळे कायम चर्चेचा विषय ठरते.  लग्न झाल्यानंतर  ४ महिन्यांतर या अभिनेत्रीनं आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. (Actress mahalakshmi expresses her love for husband ravindar chandrasekaran on social media)

महालक्ष्मीनं एक पोस्ट शेअर करताना  लग्नानंतरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. या पोस्टमध्ये तिनं मेंशन केलं की, 'माझं आयुष्य खूपच सुंदर आहे आणि तुम्ही सुद्धा......' अभिनेत्रीनं या पोस्टवरच्या कमेंट्स हाईड केल्या असून ती पोस्ट  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

रिपोर्टनुसार महालक्ष्मी आणि रविंद्र यांची ओळख विदियुम वरई कथिरू या सिनेमात झाली. सिनेमाच्या सेटवरच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं आणि या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. हे दोघंही आपल्या वैवाहीक आयुष्यात चांगले रमले असून चाहत्यांमध्ये कायम त्यांचीच चर्चा असते. 

कोण आहे रविंद्र चंद्रशेखरन

रविंद्र  चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) तमिळ चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. ते चेन्नईचे रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी २०१३ मध्ये स्वत:चं प्रोडक्शन हाऊस लिब्रा प्रोडक्शन सुरू केलं. या अंतर्गत त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट बनवले आहेत. 

महालक्ष्मीची ओळख काय?

महालक्ष्मी (Mahalakshmi) एक प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री असून ती एक व्हिडिओ जॉकी आहे. तिनं अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आरहे. तिनं एका सन म्यूझिक चॅनलमध्ये व्हिडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरूवात केली. तिनं एक्टिंगच्या क्षेत्रात काम मिळवलं आणि प्रसिद्ध टिव्ही सिरिअल्समध्ये काम केलं आहे.  

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिपTollywood