By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:00 IST
1 / 8 उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला गारवा देण्यासाठी आणि ताजंतवानं ठेवण्यासाठी ताक हे नैसर्गिक पेय मानले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरील अमृत असे म्हटले आहे. (Why should we drink buttermilk every day in summer)2 / 8 ताकाचा प्रभाव हा नैसर्गिकरित्या थंड असतो. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीराची होणारी जळजळ कमी करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक अत्यंत प्रभावी ठरते. (7 Benefits Of Drinking Buttermilk)3 / 8ताकात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात हे बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात गॅस किंवा एसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक पिणं हा त्यावर उत्तम उपाय आहे.4 / 8उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी आणि मीठ बाहेर पडते. ताकात पाणी, मीठ आणि पोषक घटक असतात जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यात आणि इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यास मदत करतात.5 / 8ताकात कॅलरीज आणि फॅट्स खूपच कमी असतता. जेवल्यानंतर ताक प्यायल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे अवेळी लागणआरी भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते.6 / 8ताकामध्ये व्हिटामीन बी-१२, कॅल्शियम आमि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात दररोज ताक प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ज्यामुळे उन्हाळ्यातील संसर्गापासून संरक्षण होते.7 / 8 दूध किंवा दह्याप्रमाणेच ताक हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. हाडांची मजबूत वाढवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी ताक उपयुक्त ठरते.8 / 8ताकामध्ये लॅक्टिक एसिड असते जे त्वचेसाठी नैसर्गिक क्लिंजरचे काम करते. नियमित ताक प्यायल्यानं त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.