Join us
Daily Top 2 Weekly Top 5

'या' कारणामुळे संध्याकाळी भूक लागते आणि वजन वाढतच जातं, बघा नेमकं काय टाळायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2026 09:40 IST

1 / 5
बहुतांश लोकांना असा अनुभव येतो की संध्याकाळी ४ ते ६ ची वेळ झाली की त्यावेळी खूप भूक लागल्यासारखं होतं. काहीतरी खावंसं वाटतं...
2 / 5
ही वेळ अशी असते की तेव्हा बहुतांश लाेक चहा किंवा काॅफी घेतात आणि त्यासोबतच बिस्किटे खातात. काही लोक फ्रेंच फ्राईज, वडापाव किंवा इतर काही तळलेले पदार्थ खातात. खरंतर अशावेळी हे सगळे तळलेले, मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं.
3 / 5
डॉक्टर असं सांगतात की संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जी भूक लागते ती प्रामुख्याने शरीरातला वात वाढल्यामुळे लागते. दुपारी २ ते ६ हा वातकाळ असतो. या काळात शरीराची रुक्षता वाढत असते.
4 / 5
शरीरातला वात वाढल्याने एनर्जी लेव्हल कमी झाल्यासारखी होते आणि काहीतरी खावंसं वाटतं. यालाच 'Cortisol Dip' असंही म्हणतात. अशावेळी नेमके चुकीचे पदार्थ पोटात गेले की वजन तर वाढतंच पण त्याचा परिणाम रात्रीच्या जेवणावर, रात्रीच्या झोपेवर होतो आणि हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.
5 / 5
हे सगळं टाळायचं असेल तर संध्याकाळी एखादं फळ खाणं चांगलं. किंवा मग मखाना, राजगिरा, मुरमुरे, फुटाणे, साळीच्या लाह्या असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावं. यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळतं, एनर्जी येते आणि शिवाय वजनही वाढत नाही.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यफळे