Join us

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय, किती प्रमाणात खायचं? वेट लॉसचं सोपं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 17:33 IST

1 / 7
चपाती आणि भात भारतीय जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. भारतीय घरांमध्ये दुपार आणि रात्रीच्या जेवणात भात, वरण, चपाती अशा पदार्थांचा आहारात समावेश करतात. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर ठरतात.
2 / 7
भात आणि चपाती यात काय बेटर आहे काय जास्त खावं अशी अनेकांची इच्छा असते. जास्तीत जास्त लोकांना भात खायला आवडतात तर काहींना चपातीशिवाय जेवण जात नाही. भारतात तांदूळ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
3 / 7
ज्यामुळे कॅलरीज वाढतात, तांदळात कार्बोहायड्रेट्सच जास्त प्रमाणात असते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर चपातीचा आहारात समावेश करा.
4 / 7
चपाती पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरेस असते. तांदळात कॅल्शियम नसते. याशिवाय पोटॅशियम, फॉस्फरेसही कमी असते. अधिकांश कार्ब्स तांदूळ आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅक्ट ग्लुकोजमध्ये बदलतात.
5 / 7
ब्राऊन राईसच्या तुलनेत पांढऱ्या भातात फायबर्स कमी असतात. ब्राऊन राईसमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स जास्त असतात. ब्राऊन राईसमध्ये मॅन्गनीज, सेलेनियम, फॉस्फरेस आणि मॅग्नेशियम असते.
6 / 7
चपातीत भरपूर पोषण असते. ज्यात सोडीयम जास्त प्रमाणात असते. तांदळात कमी डाएटरी फायबर्स असतात. चपातीत प्रोटीन्स फायबर्स जास्त असतात.
7 / 7
वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रोजच्या आहारात चपाती न खाता भाकरी खा, भात कमीत कमी प्रमाणात खा, साध्या भाताऐवजी ब्राऊन राईसचा आहारात समावेश करा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल