सकाळी चहा पिण्याच्या आधी 'हे' प्या - भराभर वजन उतरून पोट -कंबर होईल सपाट
Updated:February 13, 2026 17:01 IST2026-02-13T16:55:21+5:302026-02-13T17:01:55+5:30

वाढतं वजन कमी कसं करायचं हा प्रश्न पडला असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(weight loss drinks)
काही पेयं अशी असतात जे पचनक्रिया आणि चयापचय क्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मग आपोआपच वजन कमी होण्यास मदत हाेते.(5 morning drinks for fast weight loss)
त्या पेयांपैकी एक आहे ग्रीन टी. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात कॅटेचिन्स हे ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे फॅट्सचं ऑक्सिडेशन व्हायला आणि मेटाबॉलिझम अधिक चांगलं व्हायला मदत होते. यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साचून राहात नाही.
दुसरं आहे लिंबू पाणी. यासाठी कोमट पाण्यात थोडा ताजा लिंबाचा रस टाकून घ्यावा. बॉडी डिटॉक्स होण्यासाठी लिंबूपाणी उपयुक्त ठरतं. पण ज्यांना ॲसिडीटीचा त्रास आहे, त्यांनी लिंबू पाणी घेणं टाळावं.
ॲपल साईड व्हिनेगर पाण्यात टाकून प्यायल्यास फॅट बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे पचनक्रियाही सुधारते. तसेच त्याच्यामुळे पुढे बराच वेळ भूक लागत नाही. पोट भरल्यासारखे वाटत असल्याने क्रेव्हिंग्स कमी होतात.
रात्री १ चमचा चिया सीड्स पाण्यात भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी प्यायचे. यामुळे पचनक्रिया चांगली होते. त्यातून बऱ्याच प्रमाणात फायबर मिळतात. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले वाटते. शिवाय पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठीही चिया सीड्स उपयुक्त ठरतात.
वजन भराभर कमी करायचं असेल तर आल्याचा काढा पिणेही फायदेशीर ठरते. त्यामध्ये असणारे काही घटक पटापट फॅट बर्न होण्यसाठी मदत करतात.