Join us

तमन्ना भाटियाचा फिटनेस ट्रेनर सांगतो, वर्कआऊट करताना करताय ७ चुका म्हणून होत नाही वजन कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 17:58 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरने सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे ( Tamannaah Bhatia fitness coach advice common workout mistakes) लोकांना सहजपणे वजन कमी करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. फिटनेस कोच सिद्धार्थ सिंग (Siddhartha Singh) यांनी विशेषतः महिलांना त्या चुकांविषयी सांगितले आहे, ज्या त्या वजन कमी करण्याच्या वेळी वारंवार करतात. यामुळे नियमित व्यायाम करूनही त्यांचे वजन कमी होत नाही.
2 / 9
फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ यांच्या म्हणण्यानुसार, जर वर्कआऊट करूनही तुमचे वजन कमी होत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या वर्कआऊट रुटीनमध्ये काहीतरी लहान - सहान चुका करत आहात. सिद्धार्थ यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काही अशा टिप्स सांगितल्या आहेत, ज्यांच्या मदतीने वजन कमी करण्यास खूप मदत मिळू शकते.
3 / 9
फिटनेस ट्रेनरचे म्हणणे आहे की, वजन कमी करण्यासाठी योग्य फिटनेस रूटीन फॉलो करणे आवश्यक आहे. काही लोक रोज तोच तोच व्यायाम सारखा करतात, पण त्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही. खरेतर, रोज एकच व्यायाम केल्याने शरीरावर त्याचे कोणतेही अपेक्षित परिणाम होत नाहीत.
4 / 9
वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचा योग्य परिणाम हवा असेल, तर तुम्ही हळूहळू तुमच्या व्यायामाचे प्रमाण वाढवा. उदाहरणार्थ, सुरुवातीला जर तुम्ही कमी वजन उचलत असाल, तर नंतर तुम्ही त्यापेक्षा कमीतकमी दोन किलो वजन जास्त उचलण्याचा प्रयत्न करा.
5 / 9
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट करत असाल, तर तुम्हाला तुमच्या वर्कआऊटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. विशेषत: जर तुम्ही व्यायामाचे प्रमाण वाढवले असेल किंवा तुम्ही जास्त वजन उचलत असाल, तर तुम्हाला त्याचा रेकॉर्ड ठेवण्याची गरज आहे. नियमित व्यायामासोबतच तुम्ही करत असलेल्या व्यायामाची नोंद ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे.
6 / 9
फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ यांचे म्हणणे आहे की, इतरांचा फिटनेस पाहून तुम्ही त्यांचे फिटनेस रुटीन जसेच्या तसे फॉलो करायचा प्रयत्न करु नका.
7 / 9
इतरांचे पाहून वेगाने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे खूपच चुकीचे आहे. खरेतर, प्रत्येकाचे शरीर एकसारखे नसते, त्यामुळे तुमच्या शरीरासाठी जे उपयुक्त असेल तेच तुम्ही केले पाहिजे. म्हणजेच, तुम्हाला तुमच्या शरीराच्या गरजेनुसारच व्यायाम करायला हवा.
8 / 9
जर तुम्ही तुमचे वर्कआऊट रुटीन वारंवार बदलत असाल, तर यामुळे तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी एखाद्या व्यायामाची सुरुवात केली असेल, पण काही दिवसांतच तुम्हाला स्वतःमध्ये कोणताही फरक दिसत नसेल, तरीही तुम्ही तुमचा वर्कआऊट बदलणे टाळावे. उत्तम परिणामांसाठी योग्य पद्धतीने एकच वर्कआऊट रूटीन फॉलो करणे गरजेचे असते.
9 / 9
सिद्धार्थ यांनी सांगितले की, व्यायामातील काही चुका शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडवू शकतात. विशेषतः रोज सकाळी रिकाम्या पोटी कार्डिओ (Cardio) करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. याशिवाय, गरजेपेक्षा जास्त हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग (HIIT) करणे देखील टाळावे. उशिरा रात्री किंवा झोपण्यापूर्वी लगेच व्यायाम करणे देखील आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सतमन्ना भाटिया