रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

Updated:April 10, 2026 16:45 IST2026-04-10T16:36:50+5:302026-04-10T16:45:37+5:30

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवेत..

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

हे पदार्थ केवळ वजन कमी करण्यासाठीच फायदेशीर ठरतात असं नाही तर रक्तातली वाढलेली साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही त्यांची मदत होते.

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

त्यापैकी पहिला पदार्थ आहे पालक. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि लोह भरपूर प्रमाणात असणारा पालक तुमच्या आहारात असायलाच हवा. शिवाय पालकामध्ये फायबर आणि पाण्याचा अंशही जास्त प्रमाणात असतो. त्याचा उपयोग वेटलॉससाठी निश्चितच होतो.

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

दुसरा पदार्थ आहे बदाम. बदाममध्ये असणारे मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तसेच त्यामध्ये प्रोटीन्स आणिण फायबरही चांगल्या प्रमाणात असतात. ते मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात.

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन्स, फायबर चांगल्या प्रमाणात असतात. तसेच मूग व मुगाच्या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींसाठीही ती फायदेशीर ठरते.

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

ओट्समध्ये खनिजे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर, लोह आणि झिंक चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करणारे लोक, मधुमेही यांना ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. या लोकांनी नाश्त्यामध्ये ओट्स घेणे जास्त चांगले.

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

हार्ट पेशंट, मधुमेही आणि वजन कमी करणारे लोक या सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त ठरणारा आणखी एक पदार्थ म्हणजे नाचणी. नाचणीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर चांगल्या प्रमाणात असतं. शिवाय ट्रायग्लिसराईड, बॅड कोलेस्टेरॉल तसेच वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठीही नाचणी उपयुक्त ठरते. फायबर चांगल्या प्रमाणात असल्याने वजन कमी करणाऱ्या मंडळींसाठीही नाचणी फायदेशीर ठरते.