Join us

तब्येत चांगली ठेवायची तर ४ पदार्थ खाणं ताबडतोब बंद करा, बघा तुम्ही यापैकी कोणते पदार्थ किती खाता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2023 13:50 IST

1 / 6
हल्ली कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. त्यात व्यायाम करायलाही अनेकांना वेळ नसतो. त्यामुळे मग कमी वयातच शुगर, बीपी, स्थुलता असे अनेक आजार जडतात.
2 / 6
म्हणूनच असे आजार टाळायचे असतील तर आतापासूनच खाण्यापिण्याच्या काही सवयींमध्ये तातडीने बदल करणे गरजेचे आहे. यासाठी आहारातून नेमके कोणते पदार्थ बंद करावेत, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या health_sciience या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
3 / 6
यामध्ये सांगितलेला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे सोडा. त्यामध्ये फॉस्फरीक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असते. हे ॲसिड दात आणि हाडांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करते. तुम्ही शुगर फ्री सोडा घेत असाल, तरीही तो तेवढाच हानिकारक आहे. त्यामुळे तो घेणेही बंद करावे.
4 / 6
दुसरा पदार्थ म्हणजे साखर. साखर बंद केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण तर नियंत्रित राहतेच पण लठ्ठपणा, एजिंग प्रोसेस कमी करण्यासाठीही फायदा होतो. शिवाय चयापचय क्रिया अधिक चांगली होऊन पचनही सुधारते.
5 / 6
तिसरा पदार्थ आहे प्रोसेस्ड फूड. कोणत्याही प्रोसेस्ड फूडमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे तब्येतीसाठी हानिकारक तर असतातच पण त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही खूप वाढतो.
6 / 6
पाम ऑईल खाणंही तब्येतीसाठी अतिशय हानिकारक आहे. बिस्किटांमध्ये आणि इतर बेकरी पदार्थांमध्ये या तेलाचा खूप वापर केला जातो. या तेलामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असतात जे हृदयासाठी अतिशय हानिकारक आहेत.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्सआहार योजना