Join us

Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:37 IST

1 / 11
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज तिच्या फिटनेस आणि अभिनयासाठी ओळखली जाते. पण एकेकाळी तिचे वजन तब्बल ९६ किलो होतं. तिने कठोर परिश्रम करून आणि योग्य जीवनशैली स्वीकारून ४५ किलो वजन कमी केलं.
2 / 11
साराला PCOS (Polycystic Ovary Syndrome) नावाचा आजार होता. ही एक हार्मोनल समस्या आहे, ज्यामुळे वजन वाढतं आणि अनेक आरोग्य समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे वजन कमी करणे तिच्यासाठी आणखी कठीण होतं.
3 / 11
साराने स्वतः सांगितलं की तिला तिची आई अमृता सिंगकडून प्रेरणा मिळाली. याशिवाय करण जोहरनेही तिला म्हटलं होतं की, तिला चित्रपटांमध्ये येण्यासाठी तिचं वजन कमी करावे लागेल. या गोष्टी तिला प्रेरणा देत राहिल्या.
4 / 11
कॉलेजमध्ये असताना तिचा आत्मविश्वास खूप कमी झाला होता. ती म्हणाली, 'जेव्हा तुमचं वजन ८५ ते ९६ किलो दरम्यान असतं आणि कोणतेही कपडे फिट होत नाहीत, तेव्हा स्वतःवरील आत्मविश्वास कमी होतो.'
5 / 11
'मी त्यावेळी माझ्या वजनामुळे खूप अस्वस्थ असायचे. आजही जर जास्त खात असेल तर वजन वेगाने वाढतं.'
6 / 11
साराने कबूल केलं की, चेहऱ्यावर आणि शरीरावर लगेच फरक दिसून येतो. म्हणूनच तिला नेहमीच तिच्या आहाराची आणि रुटीनची काळजी घ्यावी लागते.
7 / 11
वजन कमी करण्यासाठी, साराने प्रथम तिचा आहार बदलला. तिने साखर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे सोडून दिले. यासोबतच ती जंक फूड आणि प्रोसेस्ड कार्ब्सपासून देखील दूर राहिली.
8 / 11
साराचं वर्कआऊट रुटीन देखील खूप कडक आहे. ती दररोज कार्डिओ, रनिंग, पिलाटेस, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा आणि डान्स करायची. कधीकधी ती एक तासापेक्षा जास्त व्यायाम करायची.
9 / 11
सारा म्हणते की, वजन कमी करणं हे फक्त दिसण्यासाठी नसावं. ते तुमच्या हार्मोनल बॅलेन्ससाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी महत्त्वाचं आहे.
10 / 11
साराचा असा विश्वास आहे की, डिसिप्लिन आणि रेग्युलर रुटीन ही वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
11 / 11
साराचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
टॅग्स : सारा अली खानवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स