थंडीत हळदीचं दूध घेताय? हळद दूध बनवण्याची योग्य पद्धत पाहा; खोकला-सर्दी दूर होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:20 IST
1 / 8थंडीच्या दिवसांत हळदीचं दूध (Turmeric Milk) बरेच जण घेतात. याला गोल्डन मिल्क असं म्हणतात हळदीच्या दुधानं इम्युनिटी वाढते, खोकल्यापासून आराम मिळण्यासही मदत होते. (Right Way to Make Turmeric Milk)2 / 8हळदीचं दूध बनवण्यासाठी १ कप गाईचं दूध किंवा नारळाचं दूध, बदामाचं दूध घ्या. अर्धा ते १ चमचा सेंद्रीय आणि चांगल्या प्रतीची हळद वापरा.3 / 8हळदीसोबत चिमूटभर काळी मिरी पूड घाला. मिरीमुळे हळदीतील कर्क्युमिनचे शरीरात शोषण वाढते.4 / 8या दूधात दीड चमचा साजूक तूप किंवा नारळाचे तेल घाला. यामुळे अधिकाधिक फायदे मिळतील.5 / 8चवीसाठी आणि अधिक फायद्यांसाठी दालचिनी किंवा सुंठ चिमूटभर वापरू शकता.6 / 8हे सर्व मिश्रण एका भांड्यात घेऊन मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं उकळू द्या.जेणएकरून मसाले दुधात व्यवस्थित मिसळतील.7 / 8दूध गाळून झाल्यावर कोमट असताना चवीनुसार गूळ किंवा मध मिसळा.8 / 8हळदीच्या दुधाचे उत्तम फायदे मिळवण्यासाठी ते रात्री झोपण्याआधी प्या.