1 / 6असे बरेच जण असतात ज्यांना सतत काही ना काही गोड खावंसं वाटतं. कधी तरी गोड खाणं ठीक आहे. पण खूप जास्त गोड खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.2 / 6सतत गोड खाण्याच्या सवयीमुळे वजन तर वाढतेच पण मधुमेहासारखे आजारही मागे लागू शकतात. शिवाय गोड खाण्याचा शरीरावर तब्येतीवर वाईट परिणामही होतोच. म्हणूनच गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी या काही गोष्टी करून पाहा. 3 / 6या काही टिप्स डॉक्टरांनी diabetesreversaldoctor या इंस्टाग्राम पेजवर शेअर केल्या आहेत. यापैकी त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे सॅण्डविचिंग. याचा अर्थ असा की जेवणाच्या सुरुवातीला गोड खाऊ नका. जेवणाच्यामध्ये गोड खा. यामुळे शुगर क्रेव्हिंग कमी होत जाईल.4 / 6जर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर केळी, सफरचंद, खजूर असे काही गोड पदार्थ खा. यामुळे आर्टिफिशियल स्वीटनरऐवजी किमान पौष्टिक पदार्थ पोटात जातील.5 / 6गोड खूपच खावंसं वाटत असेल तर पाेर्शन साईज पाळायला हवं. म्हणजेच खूप जास्त न खाता तुमच्या मनाचं समाधान होण्यासाठी अगदी थोडंसं खा.6 / 6मनावर कंट्रोल ठेवा. समोर दिसणारा गोड पदार्थ न खाल्ल्यामुळे शरीराला मिळणारे फायदे आणि तो पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला होणारे तोटे डोळ्यासमोर आणा. खाण्याची इच्छा होणार नाही.