वजन पटापट कमी करायचंय? भरपूर प्रोटीन्स देणारे ५ पदार्थ नाश्त्यामध्ये खा, काही दिवसांतच स्लिम व्हाल..
Updated:January 14, 2026 13:39 IST2026-01-14T13:28:44+5:302026-01-14T13:39:00+5:30

वजन कमी करायचं असेल तर आपल्या जेवणात असे काही पदार्थ हवेत ज्यातून आपल्याला पुरेपूर एनर्जी तर मिळेलच पण त्यामध्ये कॅलरीचं प्रमाणही कमी असेल.
असे काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला पुरेपूर प्रोटीन्स मिळतील आणि त्यामुळे मग शुगर क्रेव्हिंग किंवा नेहमीच इतर काही खाण्याची होणारी इच्छाही कमी होईल. असे कोणते पदार्थ आपल्याला नाश्त्यामध्ये खाता येऊ शकतात ते पाहूया..
पहिला पदार्थ आहे बेसनाचं धिरडं. भरपूर भाज्या घालून हे धिरडं केलं तर त्यापासून प्रोटीन्स आणि फायबर दोन्हीही चांगल्या प्रमाणात मिळतात.
दुसरा पदार्थ आहे ओट्स. ओट्स करताना त्यामध्ये मशरुम, पनीर यासोबतच इतर काही भाज्याही घाला. यामुळे ओट्सची चवही जास्त छान होईल आणि शिवाय ते पौष्टिकही होतील.
साधा डाळ- तांदुळाचा डोसा खाण्यापेक्षा मुगाच्या डाळीचा किंवा मिश्र डाळींचा डोसा खा. हा डोसा जास्त प्रोटीनुयुक्त असतो.
ड्रायफ्रुट शेक हा देखील एक उत्तम पदार्थ आहे. सुकामेवा, खजूर आणि दूध घालून केलेला ड्रायफ्रुट मिल्कशेक भरपूर एनर्जी देणारा ठरतो. त्यामुळे पुढे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजनावर नियंत्रण मिळवणं आपोआपच सोपं जातं.
नाचणीचे वेगवेगळे पदार्थ नाश्त्यामध्ये घेण्याचा विचारही तुम्ही नक्की करू शकता. नाचणीची इडली, डोसा, ढोकळा, पराठा, भाकरी असे कित्येक वेगवेगळे पदार्थ करता येतात. शिवाय या पदार्थांमधून कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात मिळते.