तिशी येता येता थकवा गाठतोय तर रोज प्या ‘हे’ पाणी, थकवा होतो गायब वाटतं फ्रेश-एनर्जेटिक
Updated:February 2, 2026 15:58 IST2026-02-02T13:05:11+5:302026-02-02T15:58:59+5:30

निरोगी आयुष्य जगायचं असेल तर वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी. विशेषत: महिलांनी वेगवेगळे आजार टाळण्यासाठी आणि फिटनेस जपण्यासाठी आहारात काही पदार्थ आवर्जून घ्यायला हवे.
त्यापैकीच एक आहे वेगवेगळे पदार्थ भिजत घालून तयार केलेलं पाणी. ते पाणी नेमकं कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं ते पाहूया..
आठवड्यातून एकदा मेथ्याचं पाणी प्यायला हवं. यासाठी रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात १ चमचा मेथ्या भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून प्या. यामुळे पोट साफ होते आणि त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही हे पाणी फायदेशीर ठरते.
बाॅडी डिटॉक्स करण्यासाठी धन्याचं पाणी पिणंही खूप फायद्याचं ठरतं. धन्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शिवाय रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासही मदत होते.
जिऱ्याचं पाणीही आठवड्यातून एकदा प्या. या पाण्यामुळेही पचनक्रिया चांगली होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते.
रात्री १ ग्लास पाण्यात ५ ते ६ लवंग भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी प्या. यामुळे श्वसनमार्ग मोकळा राहातो. इम्युनिटी वाढते आणि तोंडाचे वेगवेगळे आजारही कमी होतात.
चिया सीड्स भिजत घातलेलं पाणी रोज सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास त्वचा हायड्रेटेड राहाते. हाडांसाठीही ते फायदेशीर असतं. हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं.
ज्यांना पचन, पोट फुगणे, ॲसिडीटी असा त्रास असतो त्यांच्यासाठी बडिशेपेचे पाणी पिणं फायद्याचं ठरतं. हा उपाय फिटनेस ट्रेनरने glow_fit_mom या इंस्टाग्राम पेजवर सुचवला आहे.