1 / 7९० टक्के लोकांना खजूर खाण्याची योग्य पद्धत माहितीच नाही. म्हणूनच त्याचे म्हणावे तसे लाभ शरीराला होत नाहीत. 2 / 7खजूरामध्ये लोह, नॅचरल शुगर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अंगातला थकवा किंवा अशक्तपणा घालविण्यासाठी खजूर खाणे अतिशय उपयुक्त ठरते.3 / 7पायात गोळे येणे, मासिक पाळीमध्ये त्रास होणे, पाठ- कंबर गळून जाणे असे त्रास कमी करण्यासाठीही खजूर खाणे फायेशीर ठरते. कारण त्यामधून भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम मिळते. 4 / 7खजूर खाण्याचे पुरेपूर फायदे शरीराला मिळवून द्यायचे असतील तर ते योग्य पद्धतीने खायला हवे. त्यासाठी खजूर मधोमध कापा आणि त्याच्यातली बी काढून घ्या. यानंतर त्यामध्ये थोडासा मध घाला.5 / 7त्यानंतर त्यावर चिमूटभर सैंधव मीठ घाला. आता या पद्धतीने ७ दिवस नियमितपणे खजूर खाऊन पाहा.6 / 7ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, त्यांचा हा त्रास पुर्णपणे कमी होईल. कारण खजूर, मध आणि सैंधव मीठ हे कॉम्बिनेशन पचनक्रिया, मेटाबॉलिझम चांगले करण्यास मदत करते.7 / 7ज्यांना नेहमीच बॉडी पेनचा त्रास होतो, त्यांच्यासाठीही या पद्धतीने खजूर खाणे खूप फायद्याचे ठरते. हा उपाय योग अभ्यासकांनी humyog या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.