Join us

नेहमीच्या चपाती 'या' पद्धतीने रोज खा; झरझर वजन उतरेल, स्टॅमिनाही वाढेल भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 14:52 IST

1 / 7
वजन कमी करण्यासाठी बरेच जण वेगवेगळे पदार्थ खातात. ते पदार्थ बऱ्याचदा असे असतात की एकतर ते करणंही खूप किचकट असतं आणि दुसरं म्हणजे ते चवदारही नसतात. त्यामुळे मग काही दिवस ते खाल्ले जातात; पण नंतर मात्र आपली गाडी पुन्हा आपल्या नेहमीच्याच पदार्थांवर येते आणि वजन वाढते. (how to make weight loss chapati?)
2 / 7
त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी असे आपल्या सवयीचे नसणारे वेगळेच पदार्थ खाण्यापेक्षा तुमच्या नेहमीच्या चपात्या किंवा पराठे थोड्या वेगळ्या पद्धतीने करून खा. त्यामुळे बघा तुमचं वजन कसं पटापट कमी होईल. (cooking tips to convert your regular paratha or chapati into weight loss paratha)
3 / 7
नेहमीच गव्हाच्या पोळ्या खाऊ नका. त्याऐवजी नाचणी, बाजरी, ज्वारी असे मिश्रधान्य असणारे पीठ एकत्र करा आणि त्याच्या चपात्या खा. यामध्ये तुम्ही हवं तर काही डाळींचे पीठसुद्धा घालू शकता.
4 / 7
भरपूर तूप किंवा तेल लावून पराठे किंवा चपात्या खाणं टाळा. त्याऐवजी पराठे आणि पोळ्या कमीत कमी तेल लावून करा.
5 / 7
पराठे करण्यासाठी गाजर, मुळा, पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, मेथी अशा भाज्यांचं भरपूर स्टफिंग वापरा. यामुळे तुमच्या पोटात पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात जातील.
6 / 7
पराठे लाटल्यानंतर त्यावर थोडेसे तीळ लावा. किंवा पराठ्याच्या पिठामध्ये भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया यांचा थोडा जाडाभरडा कूट करून घाला. यामुळे पराठ्यांना एक वेगळाच कुरकुरीतपणा मिळेल. शिवाय ते अधिक पौष्टिक होतील.
7 / 7
एका ठराविक प्रमाणाच्यावर पराठे खाऊ नका. आवडले म्हणून खूप खायचे ही सवय सोडा. मोजकाच आहार घ्या. शिवाय पराठे दहीसोबत खा. दही हे प्रोबायोटिक असल्यामुळे पचनासाठी अधिक उपयुक्त ठरते.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती