1 / 6 चिया सीड्स आपण रोजच्यारोज खात नाही. पण ते आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून काही दिवस तुम्ही ते नियमितपणे खाऊन पाहा.. त्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात याविषयीची माहिती डॉक्टरांनी सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे. 2 / 6डॉ. सेठी सांगतात की चिया सीड्स दिसायला एवढेसे असले तरी ते ओमेगा ३, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन्स, फायबर, ॲण्टीऑक्सिडंट्स यांचं पॉवरहाऊस समजले जातात. कारण त्यांच्यातून हे घटक पुरेपूर प्रमाणात मिळतात.3 / 6जर तुम्ही दररोज २ टेबलस्पून एवढे चिया सीड्स खाल्ले तर त्यातून तुमच्या दिवसभराच्या फायबरच्या गरजेच्या ३० ते ४० टक्के फायबर मिळतात. त्यामुळे ते पचनक्रिया चांगली होण्यासाठीही मदत करतात. चिया सीड्स खाल्ल्यानंतर पुढे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांसाठीही ते फायदेशीर आहेत.4 / 6ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठीही चिया सीड्स उपयुक्त ठरतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनीही चिया सीड्स खायला हवेत.5 / 6बऱ्याच अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की चिया सीड्स नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरातील चांगलं कोलेस्टेरॉल वाढतं आणि त्यामुळे हृदयाचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. 6 / 6त्यामुळे डाॅक्टर असं सांगतात की रोज २ चमचे चिया सीड्स पाणी, दूध किंवा योगर्टमध्ये १५ मिनिटांसाठी भिजत घाला आणि त्यानंतर ते खा. तुम्ही रात्रभर पाण्यात, दुधात किंवा योगर्टमध्ये भिजवलेले चिया सीड्स खाल्ले तर अधिक उत्तम. यामुळे आरोग्याच्या वरील सगळ्या तक्रारी कमी होऊ शकतात.