Join us

फक्त २ आठवडे चिया सीड्स नियमितपणे खाऊन पाहा- वेटलॉस होऊन मिळतील भरपूर फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 09:20 IST

1 / 7
वाढत्या वजनामुळे चिंतेत असाल तर आहारतज्ज्ञ सांगत आहेत तो एक सोपा उपाय करून पाहा..
2 / 7
आपल्या आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करणारे कित्येक पदार्थ आपल्या स्वयंपाक घरातच असतात, पण आपल्याला त्याचे उपयोग माहिती नसतात. त्यापैकीच एक आहे चिया सीड्स..
3 / 7
चिया सीड्स आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून ते जर आपण नियमितपणे खाल्ले तर त्याचा आरोग्यावर किती चांगला परिणाम होऊ शकतो, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी sonianarangsdietclinics या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
4 / 7
यामध्ये त्या सांगत आहेत की दररोज २ चमचे चिया सिड्स जर तुम्ही सलग २ आठवडे नियमितपणे खाल्ले तर तुम्हाला तुमच्या शरीरात झालेले अनेक चांगले बदल अगदी स्पष्टपणे जाणवू लागतील. वजन कमी होण्यास मदत होईल कारण त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात.
5 / 7
चिया सीड्समध्ये ओमेगा ३ असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठीही ते अतिशय फायद्याचे ठरते.
6 / 7
चिया सीड्समध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत होते. त्वचेवर छान ग्लो येतो.
7 / 7
चिया सीड्समध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्याने दात आणि हाडांच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहे.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहृदयरोगत्वचेची काळजी