1 / 7बीटरूटचा ज्यूस पिणे खूप आरोग्यदायी आहे. जर तुम्ही ८ दिवस नियमितपणे बीटरूटचा ज्यूस प्यायला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ते बघूया..2 / 7बीटरूटचा रस नियमित प्यायलास दिवसभर खूप एनर्जेटिक वाटतं. अंगातला थकवा, आळस कमी होतो. 3 / 7बऱ्याच जणींना रात्री झोपताना पायात पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. हा त्रासही बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने कमी होतो. 4 / 7बीटरूटचा ज्यूस नियमितपणे प्यायल्यास त्याचा खूप चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्वचा अधिक चमकदार होते. 5 / 7बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळते. त्यामुळे शांत झोप लागण्यासही मदत होते. 6 / 7बीटरूटमध्ये असणारे काही घटक आपला मेंदू अधिक जागृत करतात आणि त्यामुळे एकाग्रताही वाढते. 7 / 7बॉडी डिटॉक्स होण्यासही बीटरूटचा रस मदत करतो. त्यामुळे चयापचय क्रिया, पचनक्रिया अधिक चांगली होऊन शरीर हलकं झाल्यासारखं वाटतं.