1 / 11विविध फॅटबर्निंग ड्रिंक्सबद्दल आपण ऐकत असतो. महाग पावडर विकत आणून ते पेय आपण तयार करतो.2 / 11घरी असलेल्या साध्या पदार्थांपासून विकतच्या पावडरींपेक्षा गुणकारी पेये तयार करता येतात. 3 / 11आठवड्यातले सात दिवस सात वेगवेगळ्या पेयांचे सेवन करा. प्रत्येक पेय आरोग्यासाठी चांगलं आहे. 4 / 11सकाळी रिकाम्या पोटी प्या. वजन कमी होण्यातही मदत करतील ही सर्वच पेये.5 / 11१. पाणी उकळून घ्या. त्यात मध घाला. मध पाणी घशासाठी चांगले. वजन कमी करण्यातही मदत करते.6 / 11२. आपल्याला लिंबू पाण्याचे महत्त्व तर माहितीच आहे. गरम पाण्यात एक लिंबू पिळा. आणि प्या. दिवसभरासाठीचा जीवनसत्त्वांचा कोटा भरून जाईल.7 / 11३. हळद गरम पाण्यात घालून प्या. हळद त्वचेसाठी चांगली. तसेच हळद रोगप्रतिकार शक्ती वाढवते.8 / 11४. गवती चहा आणि आलं एकत्र पाण्यात उकळा. आणि ते पाणी प्या. गवती चहा केसांसाठी चांगला. आलं पचनासाठी खुप चांगलं. 9 / 11५. धने-जीऱ्याची पावडर उकळून ते पाणी सकाळी प्या. पोट साफ होते. जर काही पचनाचा आजार असेल तर तो निघून जाईल. वजन कमी होण्यासाठी मदत होईल. 10 / 11६. दालचिनीची पावडर पाण्यात उकळा. याचे अनेक औषधी फायदे आहेत. शरीरासाठी हे पाणी फार गुणकारी आहे.11 / 11७. जास्वंदीचे फुल पाण्यात उकळून ते पाणी प्या. त्वचेसाठी आणि केसांसाठी ते फायदेशीर आहे. तसेच वजन कमी करण्यासाठीही उपयोगी आहे.