डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

Published:November 22, 2022 12:42 PM2022-11-22T12:42:21+5:302022-11-22T16:39:26+5:30

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

१. काही जणांचं डोकं सारखं दुखतं. कधी कधी खूप काम झालं म्हणून किंवा खूप थकवा आला म्हणून, ॲसिडिटी वाढली म्हणून डोकं दुखत असावं, असं आपल्याला वाटतं. पण कधी कधी डोकं का एवढं ठणकतंय याचं कारणच समजत नाही.

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

२. अशावेळी तुमच्या जेवणात आलेले काही अन्नपदार्थही तुमच्या डोकेदुखीचं कारण ठरू शकतात, असं आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना सांगितलं. त्यामुळे वारंवार डाेकेदुखी होत असेल तर पुढील काही पदार्थ खाणं टाळा. किंवा जेव्हा डाेकं दुखत असेल, तेव्हा तुमच्या खाण्यात पुढीलपैकी काही पदार्थ आले आहेत का, याकडेही लक्ष ठेवा. जेणेकरून कोणता पदार्थ तुमच्या डोकेदुखीसाठी कारण ठरतोय, याचा अंदाज तुम्हाला घेता येईल.

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

३. चीजमध्ये tyramine हा पदार्थ असतो. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. त्यामुळेही काही जणांना चीज खाल्ल्यानंतर डोकेदुखी होऊ शकते.

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

४. रेड वाईनही डोकेदुखीसाठी कारण ठरू शकते.

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

५. चॉकलेट्समध्येही tyramine कम्पाउंड असते. त्यामुळे एखाद्याला चॉकलेट खाणं सहन होत नाही. अशा व्यक्तींना चॉकलेट मिल्क, हॉट चॉकलेट प्यायल्यानेही त्रास होऊ शकतो.

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

६. आर्टिफिशियल स्वीटनर्समध्ये aspartame असते. त्याचा अतिरेक झाला तर रक्तातील dopamine ची पातळी कमी होते. त्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते.

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

७. जर दुधामधील लॅक्टोजची ॲलर्जी असेल तर काही जणांच्या डोकेदुखीसाठी दूधही कारणीभूत ठरू शकते.

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

८. लिंबू, संत्री, मोसंबी, द्राक्षे या सायट्रस फळांमध्ये octopamine हा घटक असतो. त्यामुळे अनेकांना ॲसिडीटी वाढून डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.