1 / 7तब्येत कमावण्यासाठी किंवा वजन वाढावं यासाठी हिवाळा हा ऋतू अतिशय उत्तम मानला जातो. त्याउलट उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेकांना जेवण जात नाही किंवा जेवणाची इच्छा होत नाही. म्हणून वजन कमी होतं.2 / 7पण असा अशक्तपणा येऊन वजन कमी होणं अजिबातच योग्य नाही. म्हणूनच उन्हाळ्याचा त्रास सुसह्य करून आरोग्यदायी पद्धतीने वजन उतरवायचं असेल, पोट- कंबर- मांड्यांवरची चरबी कमी करायची असेल तर या काही गोष्टी नियमितपणे करा. 3 / 7यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. या दिवसांत बऱ्याचदा जेवणाची इच्छा होत नाही. त्यामुळे अशा वेळी लिंबू सरबत, ताक, दही, पन्हं अशी सरबतं घ्या. वजन कमी होण्यास मदत होईल.4 / 7उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, काकडी अशी रसरशीत फळं भरपूर प्रमाणात असतात. दोन जेवणांच्या मध्ये जेव्हा भूक लागते, किंवा कधी काही गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा इतर काही खाण्यापेक्षा अशी फळं खा. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यासही मदत होईल. 5 / 7चिया सीड्स, सब्जा, जिरे, धने यांच्यापैकी कोणताही एक पदार्थ रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. शरीर हायड्रेटेड राहील शिवाय शरीराला थंडावा मिळेल. 6 / 7उन्हाळा असला म्हणून व्यायाम अजिबात सोडू नका. १० ते १५ मिनिटांचा व्यायाम तरी नियमितपणे करा. घराबाहेर पडून चालणे, जाॅगिंग, रनिंग, सायकलिंग असा व्यायाम करणार असाल तर तो सकाळी ऊन वाढण्याच्या आधी किंवा सायंकाळी करा. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही. 7 / 7उन्हाळ्यात प्रोटीन आणि फायबर हे दोन पदार्थ जास्त प्रमाणात असणारा आहार दुपारच्या वेळी घ्या. प्रोटिन्समुळे स्नायुंची ताकद टिकून राहण्यास मदत होते, तसेच फायबरयुक्त पदार्थांमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही.