1 / 7बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी असते. यात शाकाहारी लोकांचे प्रमाण जास्तच आहे. व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी बाजारात कित्येक सप्लिमेंट्स आहेत. पण त्यापेक्षा जर काही पदार्थ नियमितपणे खाल्ले तर व्हिटॅमिन बी १२ वाढण्यास निश्चितच मदत होऊ शकते.2 / 7त्यासाठी डाळिंब नियमितपणे खायला हवं असं तज्ज्ञ सांगतात.3 / 7गाजर आणि बीट उकडून त्यांचं सूप नियमितपणे प्या. ते देखील व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं.4 / 7काळे मनुका नियमितपणे खाल्ल्यासही व्हिटॅमिन बी १२ वाढण्यास मदत तर होतेच, पण त्यासोबतच अशक्तपणाही कमी होतो.5 / 7आल्याचा तुकडा आणि मीठ दिवसातून २ ते ३ वेळेस बारीक चावून खा. यामुळे अन्नपचन चांगले होईल, मेटाबॉलिझम चांगले होईल, भूक चांगली लागेल आणि त्याचाही फायदा व्हिटॅमिन बी १२ वाढण्यासाठी होईल.6 / 7नियमितपणे व्यायाम करणं आणि व्यायाम केल्यानंतर काही मिनिटे शवासन करणेही खूप गरजेचं आहे. ही माहिती डॉक्टरांनी gosht_faydyachi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 7 / 7याशिवाय मशरूम देखील व्हिटॅमिन बी १२ वाढण्यास मदत करतं. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून ते रोज खायला हवं.