Join us

रोज १ वेलची खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, आजार दूर पळून तब्येत राहील ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 09:15 IST

1 / 7
वेलची आपल्या घरात नेहमीच असते. पण आपण मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करतो. कधीतरीच एखादी वेलची तोंडात टाकतो.
2 / 7
पण रोज एक वेलची खाल्ली तर त्यामुळे तब्येतीला किती जबरदस्त फायदे होऊ शकतात, याची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी dimplejangdaofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
3 / 7
यामध्ये तज्ज्ञ सांगत आहेत की रोज एक वेलची खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
4 / 7
तसेच चयापचय क्रिया व्यवस्थित होऊन अन्नपचनास मदत होते.
5 / 7
काही जणांना नेहमीच तोंडाची दुर्गंधी येण्याचा त्रास असतो. रोज एक वेलची सावकाश चावून खाल्ल्याने मुखदुर्गंधी बऱ्याच प्रमाणात कमी होते.
6 / 7
वेलची खाल्ल्याने कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते, असं काही अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
7 / 7
वेलची खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स