Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रश्मिका मंदानाने लग्नात हातावर इवलीशीच मेहेंदी का लावली? नवा स्टाइल ट्रेंड की काही खास कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2026 19:12 IST

1 / 6
रश्मिकाने तिच्या लग्नसोहळ्यात हातावर अगदी लहानशी, मिनिमल मेहेंदी काढून सगळ्यांचे लक्ष वेधले. पारंपरिक भरगच्च, कोपरापर्यंत काढलेल्या मेहेंदीऐवजी तिने नाजूक डिझाइन निवडले. तिच्या हातावर दिसलेली मेहेंदी ही प्रामुख्याने मिनिमल मंडला-स्टाईल प्रकारातील आहे. म्हणजे तळहाताच्या मध्यभागी छोटा गोलाकार (मंडला) डिझाइन आणि त्याभोवती साधी रचना. हा प्रकार सध्या आधुनिक नववधूंमध्ये लोकप्रिय आहे, कारण तो सोज्वळ आणि क्लासी लुक देतो.
2 / 6
आलिया भटेने तिच्या विवाहसोहळ्यात अतिशय साधी, हलकी मेहेंदी निवडली होती. तिच्या डिझाइनमध्ये लहान मंडला आणि सूक्ष्म रेषांचे डिझाइन होते. हातभर मेहेंदी काढण्याचे टाळून तिने, अगदीच साधी मेहेंदी काढली.
3 / 6
कियारा अडवानी हिची मेहेंदीदेखील पूर्ण हातभर नव्हती. तिच्या हातावर पारंपरिक मेहेंदी डिझाइनच होते. काही वेगळे नाही मात्र ओव्हरलोडेड नव्हते. हलक्या, समतोल रचनेमुळे तिचा ब्राइडल लुक अधिक उठून दिसला.
4 / 6
परिनीती चोप्रा हिनेही साधी आणि नाजूक मेहेंदी काढली होती. तिच्या डिझाइनमध्ये सूक्ष्म फुलांचे आणि पारंपरिक मोटिफ्सचे छोटे नमुने होते, पण संपूर्ण हात व्यापणारी मेहेंदी नव्हती.
5 / 6
या सर्व अभिनेत्रींच्या निवडीवरून एक गोष्ट स्पष्ट होते, आजकाल मिनिमल ब्राइडल मेहेंदी हा स्वतंत्र ट्रेंड झाला आहे. भरगच्च मेहेंदी म्हणजेच सौंदर्य असा नियम आता राहिलेला नाही. त्याऐवजी साधेपणा, वैयक्तिक स्टाइल आणि एकूण ब्राइडल लुकशी जुळणारी मेहेंदी अधिक पसंत केली जाते.
6 / 6
रश्मिकाची लहानशी मंडला-स्टाइल मेहेंदी ही याच बदलत्या ट्रेंडचे उदाहरण आहे, मंडला प्रकारचे डिझाइन पारंपरिकच मानले जाते. फक्त हातभर मेहेंदळी नसून फक्त लहान डिझाइन असते.
टॅग्स : सोशल व्हायरलरश्मिका मंदानालग्नफॅशनआलिया भटकियारा अडवाणीपरिणीती चोप्रासामाजिकसोशल मीडिया