Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सर्दी- पडशाचा त्रास आणि घरातले डास.. दोघांनाही पळवून लावण्यासाठी फक्त ५ रुपयांचा भन्नाट उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 17:27 IST

1 / 7
पावसाळ्याचे दिवस म्हटले की घरोघर सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास असणाऱ्या व्यक्ती दिसतात. लहान मुलांना तर हे इन्फेक्शन खूप लवकर होतं.
2 / 7
याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी पाणी साचून राहाते. त्यामुळे डास होण्याचे प्रमाणही खूप वाढते. अगदी कडाकड डास चावतात. त्यातूनच मग मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे आजारही होतात.
3 / 7
म्हणूनच आता डास आणि सर्दी- पडसं असा त्रास हे दोन्हीही तुमच्या घरातून पळवून लावयचे असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा.
4 / 7
डास पळवून लावण्यासाठी हल्ली प्रत्येकाच्याच घरामध्ये एक मशिन असते. त्यातील केमिकलमुळे डास घरात येत नाहीत. मशिनचे रिफिल पॅक संपले की आपण ते फेकून देतो. पण तसे करू नका. त्याचाच खास पद्धतीने कसा वापर करायचा पाहा..
5 / 7
हा उपाय hackwithpratima02 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा व्हिक्स किंवा झेंडूबाम घ्या. यानंतर त्यामध्ये कापूराच्या २ ते ३ गोळ्या बारीक चुरा करून टाका.
6 / 7
आता या मिश्रणामध्ये अर्धे लिंबू पिळा आणि त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घाला. हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
7 / 7
यानंतर हे मिश्रण एका डास पळवून लावण्याच्या मशिनच्या रिफिल पॅकमध्ये भरा. आता हा रिफिल पॅक मशिनला लावा आणि मशिन सुरू करा. व्हिक्स, कापूर आणि लिंबू यामुळे डास पळून जातील. खोली बंद केलेली असेल तर फक्त १५ ते २० मिनिट हे मशिन चालू ठेवा आणि नंतर बंद करून टाका.
टॅग्स : सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनहोम रेमेडीमोसमी पाऊसआरोग्यहेल्थ टिप्स