1 / 8सकाळी उठल्यावर आळस येतो. झोप पूर्ण झाली असं वाटत नाही, किंवा जागेवरुन उठायचा कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही बेडवरच काही सोपे आणि कमी वेळात करता येतील असे व्यायाम केल्यास तरतरी येते आणि दिवस आळसावलेला जात नाही.2 / 8काही सेकंद डोळे मिटून मोठा श्वास घ्यायचा. ताठ बसायचे. नाकाने मोठा श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. हे ५ ते ६ वेळा करा. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि मन शांत होतं. 3 / 8त्यानंतर हात वर आकाशाकडे ताणत स्ट्रेचिंग करा. दोन्ही हात पूर्णपणे वर ताणून ठेवून काही सेकंद तसेच बसून राहा. हळूहळू हात बाजूला आणा आणि खांदे गोल फिरवा. शरीराचे जडत्व कमी होऊन आराम मिळतो.4 / 8पाठीवर झोपून पाय गुडघ्यात वाकवायचे. तसेच छातीजवळ आणायचे. दोन्ही हातांनी गुडघे पकडून हळूच शरीराकडे ओढायचे. काही सेकंद तसेच ताणून पडायचे. हे पोटावरचा ताण कमी करतं आणि पाचनशक्तीसाठी फायदेशीर ठरतं. 5 / 8एक पाय सरळ ठेवून दुसरा गुडघा दुसऱ्या बाजूकडे वळवा आणि वरचं शरीर सरळ ठेवा. यामुळे पाठीचा कणा आणि कंबरेच्या भागाला आराम मिळतो. दोन्ही पायांनी ही कृती करायची. 6 / 8बसले राहा आणि मानेचे साधे व्यायाम करा. जसे की मान डावीकडे-उजवीकडे, पुढे-मागे फिरवायची. मान आणि खांद्याच्या स्नायूंना यामुळे आराम मिळतो. सकाळी उठल्यावर मान आखडलेली वाटते तर हा प्रकार नक्की करा.7 / 8हाताच्या मुठी आवळायच्या आणि गोलाकार फिरवायच्या. असे केल्याने हातातील ताकद वाढते. सकाळी उठल्यावर हात जरा नाजूक काम करतात. तसे होणार नाही. हातातील थकवा निघून जाईल. 8 / 8हे सर्व व्यायाम प्रकार बेडवरच करता येतात. कोणतेही उपकरण लागत नाही. मुख्य म्हणजे, झोपेतून उठल्यानंतर लगेच मेंदू आणि शरीराला सक्रिय करण्यासाठी हे अतिशय प्रभावी आहेत. रोज फक्त दोन मिनिटे केलेले व्यायाम तुम्हाला दिवसभरासाठी फ्रेश ठेवतील.