International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

Published:April 29, 2023 09:38 AM2023-04-29T09:38:44+5:302023-04-29T09:40:01+5:30

International Dance Day Special

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिवस म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या नृत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही खास बॉलिवूडमधील अभिनेत्रींची झलक आज आपण पाहणार आहोत (International Dance Day Special).

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

इंडस्ट्रीमध्ये कमी वेळ राहूनही आपल्या नृत्याने चाहत्यांना वेड लावणारी हेलनचे नृत्य आजही चाहत्यांच्या मनात आहे.

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

हेमा मालिनी यांचे सौंदर्य, फिगर आणि त्यांची शास्त्रीय नृत्यावरील पकड यांमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये अतिशय कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले. या वयातही त्यांचे सौंदर्य तरुणींना लाजवणारे आहे.

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

९० च्या दशकात माधुरी दिक्षित हिने आपले सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांनी बॉलिवूडमध्ये एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले. आज वयाच्या पन्नाशीतही ही धकधक गर्ल आपल्या सौंदर्याने घायाळ करते.

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय हिच्या सौंदर्याने तर जगाला वेड लावलेच पण बॉलिवूडमध्ये ऐश म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐश्वर्याने अभिनय आणि नृत्य यांनी आपली छाप पाडली आहे. देवदास, उमराव जाम, जोधा अकबर यांतील तिच्या भूमिका आणि नृत्य आजही रसिकांच्या मनात कायम आहेत.

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

श्रीदेवी ही ८० च्या दशकातील आणखी एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. तिचे अरस्पानी सौंदर्य आणि शास्त्रीय नृत्यावरील पकड यांमुळे तिने आपले वेगळेपण सिद्ध केले. मात्र कमी वयातच तिने जगातून एक्झिट घेतली.

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

रेखा ही बॉलिवूडमधील आणखी एक सुंदर अभिनेत्री असून तिच्या नृत्यानेही रसिकांच्या मनाचा अनेक वर्ष ठाव घेतला. अभिनय आणि सौंदर्य यांमुळे रेखा ही अनेकांसाठी ड्रीम गर्ल होती.

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

चेहऱ्यावरील उत्कृष्ट असे हावभाव आणि नृत्यातील पारंगतता यांचा मिलाफ असलेल्या वैजयंती माला यांनी भरतनाट्यम नृत्यकलेतील आपले वर्चस्व कायम ठेवले.

International Dance Day Special : विलक्षण सुंदर नृत्यानं काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 8 अभिनेत्री

आताच्या काळात श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील उत्तम डान्सर म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.