lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > घरातले स्वीचबोर्ड खूप पिवळट- काळपट झाले? फक्त १ पदार्थ घेऊन झटपट करा स्वच्छ- चमकतील नव्यासारखे

घरातले स्वीचबोर्ड खूप पिवळट- काळपट झाले? फक्त १ पदार्थ घेऊन झटपट करा स्वच्छ- चमकतील नव्यासारखे

Cleaning Tips And Home Hacks For Dirty Switch Board: घरातले स्वीचबोर्ड काळपट, पिवळट झाले असतील तर त्यांना पुन्हा शुभ्र चमकविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा.... (How to clean blackish, yellowish switch board)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2024 05:52 PM2024-04-27T17:52:57+5:302024-04-27T17:54:29+5:30

Cleaning Tips And Home Hacks For Dirty Switch Board: घरातले स्वीचबोर्ड काळपट, पिवळट झाले असतील तर त्यांना पुन्हा शुभ्र चमकविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा.... (How to clean blackish, yellowish switch board)

How to clean blackish, yellowish switch board? cleaning tips and home hacks for dirty switch board | घरातले स्वीचबोर्ड खूप पिवळट- काळपट झाले? फक्त १ पदार्थ घेऊन झटपट करा स्वच्छ- चमकतील नव्यासारखे

घरातले स्वीचबोर्ड खूप पिवळट- काळपट झाले? फक्त १ पदार्थ घेऊन झटपट करा स्वच्छ- चमकतील नव्यासारखे

Highlightsतुमच्या घरातल्या स्वीचबोर्डचीही अशीच अवस्था झाली असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा...

आपण घरातल्या सगळ्या गोष्टींची स्वच्छता करतो. पण नेमकं घरातल्या स्वीचबोर्डकडेच आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग ते काही दिवसांनी काळपट, पिवळट दिसू लागतात. त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर त्याच्यावरचे डाग पक्के होत जातात. आणि मग नंतर ते स्वच्छ करणं कठीण होतं. त्याच्यावरची धूळ गेली तरी त्यावर जे पक्के डाग असतात, ते काही निघत नाहीत (cleaning tips and home hacks for dirty switch board). त्यामुळे मग स्वच्छ करूनही ते चकाचक दिसत नाहीत. तुमच्या घरातल्या स्वीचबोर्डचीही अशीच अवस्था झाली असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा... (How to clean blackish, yellowish switch board)

 

घरातले स्वीचबोर्ड स्वच्छ करण्याचा उपाय

घरातले स्वीचबोर्ड अतिशय सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ करावेत, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

सकाळी मुलांकडून ५ गोष्टी करून घ्या, त्यांची बुद्धी होईल तल्लख आणि अभ्यासात होतील हुशार....

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त १ पदार्थ लागणार आहे. आणि तो पदार्थ म्हणजे शेव्हिंग फोम.

सगळ्यात आधी तर स्वीचबोर्ड स्वच्छ करण्यापुर्वी घरातला मेन स्वीच बंद करून टाका. त्यानंतर शेव्हिंग फोम एखाद्या खराब झालेल्या टुथब्रशवर घ्या आणि त्याने स्वीचबोर्डवर घासा.

 

यानंतर १० मिनिटांसाठी शेव्हिंग फोम स्वीचबोर्डवर तसाच राहू द्या.

१० मिनिटांनंतर ब्रश थोडा ओलसर करा आणि पुन्हा एकदा स्वीचबोर्ड घासून घ्या.

वजन कमी करायचंय? मग नाश्त्यामध्ये यापैकी कोणताही १ पदार्थ घ्या, सुटलेलं पोट होईल एकदम फ्लॅट...

यानंतर एखादा स्वच्छ सुती कपडा घ्या आणि त्याने स्वीचबोर्डवरचा सगळा फोम पुसून घ्या. दुसऱ्या एखादा कपडा पाण्यात बुडवा. व्यवस्थित पिळून घ्या आणि त्या ओलसर कपड्याने पुन्हा एकदा बोर्ड पुसून घ्या. तुमच्या घरातला कळकट, पिवळट झालेला स्वीचबोर्ड पुन्हा अगदी नव्यासारखा चमकेल.

 

Web Title: How to clean blackish, yellowish switch board? cleaning tips and home hacks for dirty switch board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.