lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > पांढरे कपडे धुण्यासाठी ५ टिप्स, कपडे जुने झाले तरी पिवळट होणार नाहीत, नेहमीच राहतील चमकदार 

पांढरे कपडे धुण्यासाठी ५ टिप्स, कपडे जुने झाले तरी पिवळट होणार नाहीत, नेहमीच राहतील चमकदार 

Proper Method Of Washing White Clothes: पांढऱ्या कपड्यांवरची चमक जाऊन ते काही दिवसांतच पिवळट दिसू लागतात अशी तुमचीही तक्रार असेल तर कपडे धुताना ३ गोष्टी लक्षात ठेवा... (how to save white clothes from getting yellowish shade)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 12:41 PM2024-04-29T12:41:19+5:302024-04-29T12:42:14+5:30

Proper Method Of Washing White Clothes: पांढऱ्या कपड्यांवरची चमक जाऊन ते काही दिवसांतच पिवळट दिसू लागतात अशी तुमचीही तक्रार असेल तर कपडे धुताना ३ गोष्टी लक्षात ठेवा... (how to save white clothes from getting yellowish shade)

proper method of washing white clothes, how to wash white cloths to maintain its shine, how to save white clothes from getting yellowish shade | पांढरे कपडे धुण्यासाठी ५ टिप्स, कपडे जुने झाले तरी पिवळट होणार नाहीत, नेहमीच राहतील चमकदार 

पांढरे कपडे धुण्यासाठी ५ टिप्स, कपडे जुने झाले तरी पिवळट होणार नाहीत, नेहमीच राहतील चमकदार 

Highlightsपांढरे कपडे अगदी जुने झाले तरीही त्यांच्यावरची चमक थोडीशीही कमी होणार नाही. शिवाय ते मुळीच पिवळट रंगाचे पडणार नाहीत

पांढरे शुभ्र कपडे अंगात असले की समोरच्यावर आपली वेगळीच छाप पडते. आता सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपण आवर्जून पांढऱ्या, मोतिया रंगाच्या कपड्यांची खरेदी करतो. पण बऱ्याचदा असं होतं की ४ ते ५ वेळा पांढरे कपडे धुणं झाले की त्यांची चमक लगेच कमी होऊ लागते आणि ते पिवळट दिसू लागतात. तुमचीही पांढऱ्या कपड्यांबाबत अशीच तक्रार असेल तर ते धुताना या काही गाेष्टी अगदी आठवणीने करा (how to wash white clothes to maintain its shine). त्यामुळे मग पांढरे कपडे अगदी जुने झाले तरीही त्यांच्यावरची चमक थोडीशीही कमी होणार नाही. शिवाय ते मुळीच पिवळट रंगाचे पडणार नाहीत. (how to save white clothes from getting yellowish shade)

 

पांढरे कपडे धुण्याची योग्य पद्धत

आपण पांढरे कपडे धुताना इतर गडद रंगाच्या कपड्यांसोबत कधीच मिक्स करत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की पांढऱ्या रंगाचे कपडे इतर फिकट रंगांच्या कपड्यांसोबत धुतले जातात. पण असं करणंही चुकीचं आहे. कारण यामुळेही त्यांच्यावरची चमक कमी होऊन त्यांच्यावर पिवळट झाक दिसू शकते.

पुदिना विकत कशाला आणायचा? कुंडीत लावून टाका- भराभर वाढेल, नेहमीच ताजा पुदिना मिळेल

दुसरं म्हणजे जर पांढऱ्या कपड्यांवर काही डाग पडले असतील तर आधी तो डाग स्वच्छ करा. डाग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा थोडं पाणी घालून कालवा आणि तो त्या डागावर लावा. यानंतर ब्रशने घासून डाग स्वच्छ करा आणि त्यानंतरच तो पूर्ण कपडा धुवा.

 

पांढरे कपडे धुण्यापुर्वी तुम्ही ते डिटर्जंटमध्ये जेव्हा भिजत घालाल तेव्हा त्यात आठवणीने व्हिनेगर टाका. किंवा मशिनमध्ये धुणार असाल तर डिटर्जंटसोबतच थोडे व्हिनेगर टाकून द्या. यामुळे कपड्यांवरची चमक कायम राहण्यास मदत होईल. 

भुवया खूपच पातळ झाल्या? ४ सोपे उपाय पाहा, भुवया होतील दाट- रेखीव, चेहरा दिसेल सुंदर

पांढरे कपडे धुण्यासाठी optical brighteners हा घटक असलेले डिटर्जंट वापरा. यामुळे कपड्यांवरची चमक कायम राहण्यास मदत होईल. 

पांढरे कपडे प्रखर उन्हात वाळत घालणं टाळा. यामुळे कपड्यांची चमक कमी होते आणि त्यांच्यावर पिवळट छटा दिसू लागते.

 

Web Title: proper method of washing white clothes, how to wash white cloths to maintain its shine, how to save white clothes from getting yellowish shade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.