टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

Published:November 21, 2023 03:48 PM2023-11-21T15:48:33+5:302023-11-21T15:53:07+5:30

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

डबा कितीही पॅक केला तरी थोडेसे तेल गळतेच. किंवा डब्यातले पातळ पदार्थ बॅगमध्ये सांडतातच. त्यामुळे मग हळूहळू टिफिन बॅगला कुबट वास येऊ लागतो. या बॅगमध्ये मग डबा किंवा टिफिन ठेवायलाही नकोसे वाटते.

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

वारंवार ही बॅग धुणे शक्य नसते. म्हणून हे काही सोपे उपाय बघा. यामुळे न धुताही टिफिन बॅगला येणारा दुर्गंध नाहीसा होईल.

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही बॅग घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती ऑफिस किंवा शाळेत नेईपर्यंत उघडी ठेवा. तिचं झाकण लावू नका. म्हणजे वास कमी होईल.

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

एक बटाटा घेऊन त्याच्या फोडी करा. त्या फोडींना मीठ लावून त्या बॅगच्या आतल्या बाजुने घासा. १५ ते २० मिनिटे फोडी बॅगमध्ये तशाच राहू द्या. दुर्गंध कमी होईल.

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

दालचिनीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटक असतात. तसेच दुर्गंध घालविण्याचीही क्षमता असते. हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यात पाणी घ्या. त्यात दालचिनी टाकून ते उकळा. दालचिनीचा सुगंध असलेल्या या पाण्याने आता बॅगचा आतला भाग पुसून काढा. दुर्गंध कमी होईल.

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

लिंबाच्या फोडी टिफिन बॅगमध्ये रात्रभर टाकून ठेवा. सकाळी बॅगचा दुर्गंध कमी झालेला असेल.

टिफिन बॅगला कुबट वास येतो? बघा न धुता टिफिन बॅगचा दुर्गंध घालविण्याचे ५ सोपे उपाय

लिंबाच्या फोडींप्रमाणे बेकिंग सोडाही उपयुक्त ठरतो. बॅगमध्ये रात्रभर बेकिंग सोडा टाकून ठेवल्यास बॅगला येणारा वास कमी होईल.