By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 20:18 IST
1 / 8उन्हाळ्याच्या कडाक्याच्या किचनमध्ये काम करणं खूपच कष्टाचं ठरतं. किचनमध्ये तापमान कमी ठेवण्यासाठी आणि स्वयंपाक करताना सुसह्य वाटावे यासाठी काही टिप्स उपयोगी ठरतील. (How To Keep Kitchen Cool In Summers)2 / 8 स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन सतत सुरू ठेवा. जेणेकरून गरम हवा आणि वाफ बाहेर येईल. शक्य असल्यास खिडक्या उघड्या ठेवा. (How To Cool A Kitchen In The Summer)3 / 8 दुपारी जेव्हा ऊन जास्त असते तेव्हा स्वयंपाक करणं टाळा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर जास्तीत जास्त स्वयंपाक उरकून घ्या.4 / 8किचनमध्ये जास्त उष्णता निर्माण करणारे पिवळे बल्ब टाळा. त्याऐवजी थंड प्रकाश देणारे एलईडी बल्बब वापरा आणि गरज नसेल तेव्हा लाईट्स बंद करा.5 / 8ओव्हन किंवा टोस्टर यांसारखी उपकरणं उष्णता निर्माण करतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांचा वापर कमीत कमी करा.6 / 8किचनच्या खिडकीतून थेट ऊन येत असेल तर तिथे बांबूचे पडदे किंवा जाड कापडी पडदे लावा. यामुळे सुर्याची उष्णता आत येणार नाही.7 / 8उन्हाळ्यात जास्तवेळ गॅससमोर उभं राहावं लागेल असे पदार्थ टाळा. वाफेवरचे किंवा झटपट होणारे हलके पदार्थ तयार करण्यावर भर द्या.8 / 8कुकरचा वापर अधिक करा. ज्यामुळे उष्णता बाहेर कमी पडते आणि अन्न लवकर शिजते किचनच्या खिडकीजवळ छोटी रोपं लावा. यामुळे वातावरणात थोडा गारवा टिकून राहण्यास मदत होते.