Join us

उधळीत ये रे गुलाल सजणा पण गुलाल डोळ्यात गेला तर? डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 13:39 IST

1 / 10
होळी म्हणजे आनंदाचा सण. होळीमध्ये भारतभर उत्साहाचे वातावरण असते. होळीच्या दिवशी तसेच. रंगपंचमीपर्यंत जागोजागी रंग खेळले जातात. कोणी लाल तर कोणी गुलाबी झालेले असते. रंगपंचमी झाल्यानंतरही पुढचे काही दिवस चेहेरे रंगीबेरंगी दिसतात. होळीची मज्जा काही औरच आहे.
2 / 10
मज्जा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे मात्र गरजेचे असते. केसांची काळजी घेणे, त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रंग चांगल्या दर्जाचेच वापरा. रंगांमुळे शरीराची हानी होणार नाही याची काळजी घ्या.
3 / 10
साधा पाण्याचा थेंब जरी डोळ्यात गेला तरी डोळे झोंबतात. तर विचार करा हे रंग डोळ्यात गेल्यावर त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रंग डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
4 / 10
डोळ्यामध्ये रंग गेला तर त्याची ऍलर्जी होऊ शकते. डोळ्यांची आग होते. सुज येते. पिचकारीचा फवारा जर डोळ्यावर बसला तर त्याचा मारा फार भयंकर ठरू शकतो.
5 / 10
डोळे म्हणजे नाजूक अवयव. त्याला काही इजा पोहचू नये यासाठी या रंग खेळताना डोळ्यांची काळजी घ्या.
6 / 10
जर तुम्हाला गॉगल लावायला आवडत असेल तर, डोळ्यांना गॉगल लावून होळी खेळा डोळ्यामध्ये रंग जाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
7 / 10
केस बांधून खेळा असे केल्याने केस उडून डोळ्यामध्ये पाणी जाणार नाही. सुट्टे केस डोळ्यांवर येतात. त्यामध्ये अडकलेला रंग डोळ्यात जाऊ शकतो.
8 / 10
कोणी तुम्हाला रंग लावत असेल तेव्हा डोळे बंद करून घ्या. एकदा डोळ्यांवरून हात फिरवा. मगच डोळे उघडा.
9 / 10
जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर रंग खेळताना चष्मा वापरा लेन्स नको. लेन्समध्ये रंग अडकू शकतो. तसे झाल्यास नक्कीच पंचायत होईल.
10 / 10
एवढं करून रंग डोळ्यामध्ये गेलाच तर आपण डोळे चोळतो. डोळे अजिबात चोळू नका. तसं केल्याने रंग आणखी आत जातो. रंग डोळ्यात गेल्यावर लगेच स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. तरच तो रंग बाहेर पडेल.
टॅग्स : होळी 2025रंगहेल्थ टिप्सत्वचेची काळजी