1 / 10'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' असं म्हणतं अनेकांनी वृक्षतोड, जंगलतोड यांविरूद्ध आंदोलने केली आहेत. विविध उपक्रमांसाठी झाडे तोडली जातात. पण त्याचा अत्यंत वाईट परिणाम पर्यावरणावर होतो. 2 / 10लोक झाडांभोवती उभे राहून, पोलीसात तक्रार नोंदवून, न्यायालयात खटले चालवून आंदोलने करतात. हे आपण पाहीले आहे.3 / 10पण या अमेरिकन महिलेने पत्करलेला मार्ग फारच वेगळा आणि साहसी आहे. 'ज्युलीआ बटरफ्राय हील' असे या महिलेचे नाव आहे. ती पर्यावरण संरक्षक म्हणून कार्यरत आहे.4 / 10१९९७ मध्ये पॅसिफिक लंबर कंपनी या उद्योजक संस्थेला एका प्रकल्पाअंतर्गत, १ हजार वर्ष जुने कॅलिफॉर्निया रेडवुड प्रजातीचे झाड तोडायचे होते. पण ज्युलीआने त्यासाठी तिचा विरोध दर्शवला. 5 / 10तिच्या बोलण्याने ते थांबणार नव्हते. म्हणून तिने त्या झाडावरतीच स्वत:च घर बांधून त्यात रहायला सुरवात केली. ६ बाय ४ च्या जागेत तिने रहायला सुरवात केली. झाडाची उंची २००फुट होती. हवा, वादळ, पाऊस कशाचाही विचार न करता ज्युलीआने तिचे आंदोलन सुरू केले. 6 / 10 तिने एका आठवड्यासाठी त्या झाडावर राहण्याचे ठरवले. पण बघता-बघता तब्बल ७३८ दिवस ती त्या झाडावर राहिली. त्या झाडाला तिने लुना असे नाव दिले.7 / 10लोकांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी तिला मदत केली. जेवण नेऊन दिले. पाणी दिले. तिला लागणार्या सर्व वस्तूंचा पुरवठा लोकांनी केला.8 / 10सोलरवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करून ज्युलीआ त्या जंगलात राहिली. मिडियाशी सतत संपर्कात राहून ती लोकांना उपदेश करत होती. अनेकांनी तिला सहकार्य केले. 9 / 10१९९९ साली तिच्या कष्टांना यश मिळाले. पेसिफिक लंबर कंपनीने लुना झाड आणि इतरही झाडे न तोडण्याचे आश्वासन दिले. 10 / 10ज्युलीयाचे हे योगदान जगभरातील पर्यावरण संरक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले. ती एक नामवंत ॲक्टिव्हिस्ट तर आहेच. पण ती एक लेखिकाही आहे.