Join us
Daily Top 2 Weekly Top 5

LPG सिंलेडर संपलाय, बुकिंगही मिळत नाही ? रांगेत उभं राहण्यापेक्षा पाहा 'हे' स्वस्त पर्याय - करा झटपट स्वयंपाक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 15:38 IST

1 / 11
सध्या इराण आणि अमेरिकेमधील तणाव वाढल्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतींमध्ये चढ -उतार होत आहेत. त्याचा थोडाबहुत परिणाम भारतातही दिसून येत असून LPG गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आणि प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे... (gas alternatives for cooking at home)
2 / 11
एलपीजी (LPG) गॅसचे दर गगनाला भिडले असून, सिलेंडर बुक केल्यानंतरही तो हातात मिळवण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे, इतकंच नाही तर अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यासाठी लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. गॅस बुक केल्यानंतरही तो वेळेवर मिळत नाही अशी तक्रार अनेक गृहिणी करतात...अशा परिस्थितीत रोजचा स्वयंपाक कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहतो(kitchen cooking alternatives without gas).
3 / 11
गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगांमुळे आज सामान्यांचे बजेट आणि वेळ दोन्ही कोलमडले आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत, जर तुमच्या घरातील गॅस संपला तर हताश होऊ नका. गॅस सिलेंडरला पर्याय ठरू शकतील अशा काही आधुनिक आणि पारंपरिक पद्धती वापरून तुम्ही झटपट स्वयंपाक करु शकता. गॅस सिलेंडर नसेल तर स्वयंपाकासाठी कोणते पर्याय वापरता येऊ शकतात ते पाहूयात...
4 / 11
गॅस नसल्यास सर्वात सोपा आणि आधुनिक पर्याय म्हणजे इंडक्शन. हे वीजेवर चालते आणि गॅसपेक्षाही वेगाने स्वयंपाक होतो. आजकाल बहुतेक भांडी इंडक्शन फ्रेंडली असतात. अशा परिस्थितीत हा सर्वात सुरक्षित आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो.
5 / 11
फक्त भातच नाही, तर इलेक्ट्रिक कुकरमध्ये तुम्ही डाळ, खिचडी किंवा अगदी भाज्याही शिजवू शकता. हल्ली बाजारात मिळणारे 'मल्टिकुकर' भाजी किंवा सूप बनवण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. उपमा, खिचडी, नूडल्ससारखे अनेक पदार्थ देखील बनवता येतात.
6 / 11
जर तुमच्याकडे इंडक्शनवर चालणारी भांडी नसतील, तर जुन्या पद्धतीची इलेक्ट्रिक कॉईल शेगडी (Hot Plate) हा उत्तम पर्याय आहे. हा एक साधा आणि स्वस्त पर्याय आहे. हॉट प्लेटवर गॅसप्रमाणेच भांडे ठेवून स्वयंपाक करता येतो. यावर तुम्ही तुमची नेहमीची कोणतीही भांडी वापरून चपाती, भाजी किंवा चहा बनवू शकता.
7 / 11
ओव्हनचा वापर फक्त पदार्थ गरम करण्यासाठीच नाही, तर स्वयंपाकासाठीही करता येतो. काही विशिष्ट प्रकारच्या भाज्या आणि भात ओव्हनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आणि अगदी कमी वेळेत झटपट करता येतात.
8 / 11
जर तुमच्याकडे मोकळी गच्ची किंवा बाल्कनी असेल जिथे पुरेसा सूर्यप्रकाश येतो, तर सोलर कुकर हा सर्वात स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. सूर्याच्या उष्णतेचा वापर करून स्वयंपाक करण्यासाठी सोलर कुकर हा उत्तम पर्याय आहे.यात डाळ, भात आणि भाज्या शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण इंधनाची पूर्णपणे बचत होते.
9 / 11
लाकूड किंवा कोळसा वापरून बनवलेली चूल हा अजूनही अनेक ठिकाणी वापरला जाणारा सोपा पर्याय आहे. यात भाकरी, भाजी किंवा भात सहज बनवता येतो.
10 / 11
एअर फ्रायरमध्ये कमी तेलात स्नॅक्स, भाज्या, पराठे गरम करणे किंवा काही पदार्थ बनवणे शक्य असते. पूर्ण स्वयंपाक नसला तरी स्नॅकिंग किंवा काही इन्स्टंट पदार्थांसाठी उपयोगी ठरतो.
11 / 11
कॅम्पिंग गॅस स्टोव्ह हा छोटा पोर्टेबल स्टोव्ह असतो. छोट्या गॅस कॅनवर चालतो आणि अगदीच गरजेच्या परिस्थितीत स्वयंपाकासाठी उपयोगी पडतो.
टॅग्स : सोशल व्हायरलएलपीजी गॅस टंचाईकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सगॅस सिलेंडरहोम अप्लायंस