By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:21 IST
1 / 9लसूण सोलणं (Garlic Peeling) हे किचनमधलं सर्वात कष्टांचं आणि वेळखाऊ काम वाटतं. पण काही साध्या ट्रिक्स वापरल्या तर तुम्ही काही मिनिटांत भरपूर लसूण सोलू शकता. (How To Peel Garlic Easily Garlic Peeling Hacks)2 / 9अख्खा लसूण हाताच्या तळव्यानं किंवा जड वस्तूनं जोरात दाबा.त्यामुळे मुळाकडचा भाग सैल होतो आणि पाकळ्या पटकन सुटून सालं मोकळी होतात. (Garlic Peeling Hacks)3 / 9लसणाच्या पाकळ्या अर्धा तास फ्रिजरमध्ये ठेवा आणि बाहेर काढून लगेच कोमट पाण्यात घाला. तापमानातील या बदलांमुळे साल आणि लसूण यांच्यातील पकड सैल होते आणि साल कागदासारखे निघून जातात.4 / 9लसणाच्या पाकळ्या एका जाड आणि खडबडीत सुती कपड्यात गुंडाळा. तो कपडा जमिनीवर ठेवून हातानं चोळा. यामुळे साल कड्याला चिकटून राहतात आणि लसूण स्वच्छ बाहेर येतो.5 / 9 जर तुम्ही भरपूर लसूण सोलत असाल तर पाकळ्या एका जाळीच्या टोपतील ठेवा आणि नळाच्या प्रेशरखाली हातानं चोळा. ओलेपणामुळे घर्षण वाढते आणि सालं धुतली जाऊन वेगळी होतात.6 / 9लसणाची सालं ही खूपच हलकी असतात. लसूण हलका ठेचून झाल्यानंतर त्यावर ड्रायरनं गरम गवा सोडा. वजनानं हलकी असलेली सर्व सालं उडून जातील आणि फक्त सोललेला लसूण मागे राहील.7 / 9बऱ्याचदा आपण सालं काढण्याचा प्रयत्न करतो. पण खरी पकड मुळाशी असते. चाकूनं लसणाच्या मुळाकडचा भाग कापून टाका आणि मग साल ओढा. ज्यामुळे सालं सहज निघतील.8 / 9पाकळ्यांवर थोडं जाड मीठ घाला आणि डब्यात ठेवा. मिठाचा खरखरीतपणा स्क्रबसारखे काम करतो आणि सालं सोलून काढतो.9 / 9लसूण सोलण्यापूर्वी हाताला आणि लसाणाला थोडं तेल लावा. यामुळे हाताला वास येत नाही आणि हाताचं घर्षण कमी होऊन सालं हातात अडकण्याऐवजी सरसर बाजूला होतात.