1 / 8बॉलीवूडची डोळे दिपवून टाकणारी दुनिया अनेकांना पार वेड लावते. याच वेडापायी कित्येकजण घरदार सोडून मुंबईत येऊन दाखल झाले. काहींनी स्वत:ला सिद्ध करत या मोहमायेत स्वत:ची जागा निर्माण केली, तर काही आले तसे निघूनही गेले. यामध्ये अभिनेत्रींचे प्रमाणही बरेच आहे.2 / 8बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रानौतही तशीच. अतिशय सामान्य कुटूंबातल्या कंगणाने मोठ्या हिंमतीने तिचे घर सोडले आणि खूपच कमी वेळात स्वत:ला सिद्ध केले. 3 / 8मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेची गोष्टही तशीच. तिच्या घरच्यांना तिचं अभिनय करणं मान्य नव्हतं. 4 / 8छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री हिना खान हिच्या पालकांचीही तिने या क्षेत्रात यावे, अशी इच्छा नव्हती. 5 / 8घरच्यांची नाराजी ओढवून अभिनय क्षेत्रात आलेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे शेहनाज गिल.6 / 8सारा अली खानला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी घरदार सोडण्याची गरज पडली नाही. पण तिचे वडील म्हणजेच अभिनेता सैफ अली खान याला साराने या क्षेत्रात येणं आवडलेलं नव्हतं.7 / 8करिश्मा कपूर हिनेही जेव्हा वयाच्या १५ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली, तेव्हा तिच्या वडिलांना म्हणजेच रणधीर कपूर यांनाही ते पटलेलं नव्हतं. ते तिच्यावर खूप नाराज होते. पण तिलाही इतर अभिनेत्रींप्रमाणे घर सोडून यावं लागलं नव्हतं. 8 / 8अभिनेत्री मल्लिका शेरावत ही देखील अतिशय सामान्य कुटूंबातली आहे. तिच्या कुटूंबात तर महिलांनी चित्रपट पाहायला जाण्याचीही परवानगी नव्हती. अशा वातावरणातून ती पळून आली आणि थेट मुंबई गाठून स्वत:चं नशिब आजमावून पाहिलं- स्वत:ची ओळख निर्माण केली.