प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

Published:January 22, 2024 02:12 PM2024-01-22T14:12:02+5:302024-01-22T14:21:09+5:30

10 Interesting Facts About Sania Mirza : सानियाला नेहमी ट्रोल केलं गेलं, पण तिने कधी हार मानली नाही; ती लढत गेली आणि..

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

भारतात क्रिकेटचं नाव घेताच लोकांच्या मुखातून आपसूकच 'सचिन तेंडूलकर' हे नाव येतं. त्याचप्रमाणे टेनिस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर, टेनिस या खेळातून समोरच्या प्रतिनिधीचे घाम काढणारी सानिया मिर्झा येते. सानिया मिर्झा संपूर्ण भारतच नाही तर, जगभरातही तितकीच प्रचलित आहे. भारतातील सर्वात निपुण महिला टेनिसपटू म्हणून तिचे नाव आदराने घेतले जाते. तिने आजतागायत अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत. फक्त टेनिस विश्वात नसून, तिने झगमगाट विश्वातही अनेक कामे केली आहेत(10 Interesting Facts About Sania Mirza).

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

पण सानिया सध्या आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे. २० जानेवारी रोजी सानियाचा एक्स हसबॅण्ड अर्थात पाकिस्तान संघातील क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसरे लग्न केले. या कारणास्तव तिने शोएबकडून 'खुला' घेतला आहे. पण या व्यतिरिक्त सानियाच्या अनेक अशा गोष्टी आहेत, जे प्रत्येकाला ठाऊक आहेच असे नाही.

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

सानियाचा जन्म १५ नोव्हेंबर १९८६ रोजी मुंबईतील मायानगरीत झाला. सानियाचे शिक्षण हैद्राबादमध्ये पूर्ण झाले. तिचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद येथील एनएएसआर शाळेत झाले. त्यानंतरचे शिक्षण हैदराबादच्या सेंट मेरी कॉलेजमधून केले. या महाविद्यालयातून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ११ डिसेंबर २००८ रोजी तिला एमजीआर शैक्षणिक आणि संशोधन संस्था विद्यापीठ, चेन्नईकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

सानियाचे वडील इम्रान मिर्झा हे क्रीडा पत्रकार आणि सानियाचे प्रशिक्षक आहेत. सानियाच्या आईचे नाव नसीमा मिर्झा आहे. तिची बहीण अनम मिर्झा हिचे स्वतःचे फॅशन लेबल आहे. सानियाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सहाव्या वर्षी हैदराबादच्या निजाम क्लबमध्ये टेनिस खेळातून केले. महेश भूपतीचे वडील आणि भारताचे यशस्वी टेनिसपटू सीके भूपती यांच्याकडून तिने सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. टेनिसकडे तिचा कल वाढवण्यात तिच्या वडिलांचे मोठे योगदान आहे.

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

१९९९ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी सानियाने आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने वर्ल्ड ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. सानियाने आजवर ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत. तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. सध्या सानिया डब्ल्यू.टी.ए.च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तर, २००६ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. सध्याच्या घडीला सानिया भारताच्या तेलंगणा या राज्याची ब्रॅण्ड ॲम्बॅसॅडर आहे. सानियाच्या आत्मचरित्रावर 'ऐस अगेन्स्ट ऑड्स' या पुस्तकाची निर्मितीही करण्यात आली आहे. या पुस्तकात तिचा भारतातील आणि जगातील सर्वोच्च महिला टेनिसपटू बनण्याचा प्रवास आहे. शिवाय या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले होते.

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

सानियाने २०२३ साली टेनिस या खेळातून निवृत्ती घेतली. पण शेवटच्या सामन्यात तिला पराभवाला सामोरे जावे लागले. डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिप तिच्या कारकिर्दीतील शेवटचा खेळ ठरला. अखेरच्या सामन्यात ती अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजसोबत मैदानात उतरली. त्यांच्यासमोर रुसची सर्वात यशस्वी जोडी र्नोकिया कुडेरमेटोवा- ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांचे आव्हान होते. या स्पर्धेत सानिया उत्तम कामगिरी दाखवेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच फेरीत तिच्या वाटेला अपयश आले.

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सिमेपलिकडचं हे प्रेम अनेकांना मान्य नव्हते. सानिया व या दोघांनी प्रेम विवाह केला होता. त्यांच्या लव्ह स्टोरीचीही चांगलीच चर्चा झाली होती. तिने आपल्या लव्ह लाईफबद्दल आपल्या आत्मचरित्रात माहिती दिली आहे. सानिया आणि शोएबची पहिली भेट २००३ साली ऑस्ट्रेलियात झाली. सुरुवातीला सानियाला शोएब फारसा आवडला नसल्याने तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

प्रेमासाठी किंमत मोजली पण स्वाभिमान नाही सोडला! सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची चर्चा आणि...

पुढे २००९ मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. दोघेही ऑस्ट्रेलियाच्या होबार्टमध्ये भेटले होते. त्यावेळी शोएबने सानियाला तिचा फोन नंबर मागितला होता. यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या १२ वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचं ठरवलं.