Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Republic Day 2026: पांढऱ्या साडीवर शोभून दिसणारे १० रंगांचे ब्लाऊज, नेहमीपेक्षा वेगळा लूक-सोबरही स्मार्टही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:10 IST

1 / 10
प्रजासत्ताक दिनाला (Republic Day 2026) जर तुम्ही पांढरी साडी नेसणार असाल तर त्यावर पांढरं ब्लाऊज न शिवता कलरफुल ब्लाऊज शिवले किंवा नवीन न शिवता घरातल्याच एखाद्या साडीवरचं ब्लाऊज जर तुम्ही घातलं तर लूक खुलून येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. (White Saree For women 10 Sarees For Republic Day)
2 / 10
घरातल्या एका कोणत्याही जुन्या साडीचं ब्लाऊज तुम्हाला सुंदर लूक देईल. प्रजासत्ताक दिनासाठी तुम्हाला युनिक लूक हवा असेल तर या प्रकारचं ब्लाऊज घालू शकता. (Republic Day Saree look)
3 / 10
जर तुम्हाला कॉटन प्रिंटचं ब्लाऊज आवडत असेल तर तुम्ही या प्रकारचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता. नंतर ते तुम्हाला काळ्या साडीवरही वापरता येईल. (10 White Sarees With Colorful Blouse)
4 / 10
पिवळा रंग हा रॉयल लूक देतो. जर तुम्ही पांढऱ्या साडीवर पिवळ्या रंगाचं ब्लाऊज घातलं तर सगळ्यात उठून दिसाल. जर साडीची बॉर्डर सोनेरी असेल तर आवर्जून पिवळा रंग ब्लाऊजचा असावा.
5 / 10
लाल किंवा मरून रंगाचं वर्क असलेलं ब्लाऊज तुम्हाली एक रॉयल लूक देईल. ज्यात तुम्ही सिंपल पण आकर्षक दिसाल.
6 / 10
जर साडीची किनार गुलाबी असेल किंवा प्लेन पांढरी साडी असेल तर तुम्ही त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाऊज शिवू शकता.
7 / 10
हिरवं ब्लाऊजसुद्धा उठून दिसेल. तिरंग्यातील एक रंग म्हणून हिरव्या रंगाचं ब्लाऊज आणि पांढरी साडी असं कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर कमालीचा सुंदर लूक दिसेल.
8 / 10
याशिवाय फुल स्लिव्हज लाल प्रिंट असलेलं ब्लाऊजसुद्धा रिच दिसेल. तुम्ही प्रजासत्ताक दिनाला बाहेर जाताना हा लूक करू शकता.
9 / 10
यातील सर्व रंग पांढऱ्या तसंच मोती रंगाच्या साडीवर उठून दिसतील. तुम्ही कोणत्याही प्रकारे साडी स्टायलिंग करू शकता.
10 / 10
जर तुम्ही साडी खादी कॉटन किंवा लिनन कॉटनची असेल तर असे अंगाला व्यवस्थित बसणारे कॉटनचे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.
टॅग्स : प्रजासत्ताक दिन २०२६खरेदीफॅशनभारतीय उत्सव-सणसाडी नेसणेशाळा