गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

Published:August 21, 2022 07:00 PM2022-08-21T19:00:26+5:302022-08-21T19:10:38+5:30

Gauri Ganpati Jewelry Shopping Ganpati Festival : पाहा गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय

गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

गौरी गणपती काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना आपल्या घरच्या गौरी छान दिसाव्यात यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो. गौरीची साडी, मुकुट, तिचे दागिने, मुखवटे अशी सगळी तयारी एव्हाना सुरू झाली असेल. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सगळं बंद असल्याने खरेदीला फारसा वाव मिळाला नाही. मात्र यावर्षी तुम्ही गौरीसाठी दागिने बघत असाल तर दागिन्यांचे काही छान, वेगळे पर्याय पाहूया (Gauri Ganpati Jewelry Shopping Ganpati Festival).

गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

आपण ज्याप्रमाणे छान छान दागिने घालून सजतो त्याचप्रमाणे आपल्या गौरी देखण्या दिसाव्यात यासाठी बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे हार सज्ज झाले आहेत. अगदी १०० रुपयांपासून हे देखणे हार उपलब्ध असून तुम्हाला गौरींसाठी जास्त ज्वेलरी आवडत नसेल तर हा उत्तम पर्याय आहे.

गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

गौरी म्हटल्यावर मंगळसूत्र तर ओघानेच आले. आपल्याला ज्याप्रमाणे वेगवेगळी मंगळसूत्र वापरायला आवडते त्याचप्रमाणे गौरीलाही वेगळ्या पद्धतीची मंगळसूत्री अतिशय खुलून दिसतात. गळ्याला लागून असलेली किंवा लांब मंगळसूत्री उभ्या गौरींना छान दिसतात.

गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

पारंपरिक पद्धतीचे गळ्याला लागून असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हारही अतिशय सुंदर दिसतात. यामध्ये मोत्यांचे, सोनेरी, खड्यांचे असे बरेच प्रकार बाजारात सध्या उपलब्ध आहेत.

गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

मोत्याच्या दागिन्यांची मजाच काही न्यारी. मोत्याचे दागिने अतिशय पारंपरिक आणि रुप खुलवणारे ठरतात. यामध्ये भरपूर व्हरायटी पाहायला मिळतात. तसेच अगदी १०० ते २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आपल्याला हव्या त्या व्हरायटीमध्ये हे दागिने उपलब्ध असतात.

गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

कंबरपट्टा हा अतिशय पारंपरिक असलेला ज्वेलरीतील एक मुख्य प्रकार आहे. कंबरपट्ट्यामध्येही बरेच पॅटर्न असतात. कंबरपट्ट्यामुळे जसा आपला लूक खुलतो त्याचप्रमाणे गौरींवरही कंबरपट्टा अतिशय छान खुलतो.

गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय...

मुकुट ही गौरींचे सौंदर्य खुलवणारा आणखी एक महत्त्वाची गोष्ट. बाजारात सध्या खड्यांचे, वेगवेगळ्या डिझाईनचे अतिशय छान मुकुट मिळतात. हे मुकुट अतिशय सुंदर दिसतात आणि गौरी आपल्या घरच्या माहेरवाशीणी असल्याने त्यांना छान सजवून आणलेले केव्हाही चांगले.