Lokmat Sakhi >Shopping > Mother's Day Special : गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी!

Mother's Day Special : गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी!

Mother's Day Special 2024 : Saree For Mother For Gift : मदर्स डे निमित्त आईला द्या गुलाबी साडी; खिश्याला परवडणारी - लेटेस्ट डिझाईनच्या साड्या आईला नक्कीच आवडतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2024 02:01 PM2024-05-12T14:01:27+5:302024-05-12T14:04:53+5:30

Mother's Day Special 2024 : Saree For Mother For Gift : मदर्स डे निमित्त आईला द्या गुलाबी साडी; खिश्याला परवडणारी - लेटेस्ट डिझाईनच्या साड्या आईला नक्कीच आवडतील..

Mother's Day Special 2024 : Saree For Mother For Gift | Mother's Day Special : गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी!

Mother's Day Special : गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी!

फक्त एक नाही, तर प्रत्येक दिवस हा आईचाच असतो (Mother's Day Special). पण आईला विशेष वाटावे म्हणून देशात मातृदिन साजरा केला जातो. यंदा सर्वत्र १२ मे रोजी मातृदिन साजरा करण्यात येत आहे. आईचा हा सोहळा प्रत्येक घरात आनंदित साजरा होतो. मुलं आपल्या आईकरीता विविध गोष्टी करतात. तिला खास वाटावं म्हणून, भेटवस्तू देतात.

मातृदिनानिमित्त जर आपल्याला आईसाठी खास काही गोष्टी करायच्या असतील तर, त्यांना खास आणि युनिक प्रकारची साडी गिफ्ट म्हणून द्या. वय झाल्यानंतर आपली आई स्वतःकडे कमी लक्ष देते. जर आपली आई आजच्या खास प्रसंगी सुंदर दिसावी असं वाटत असेल तर, 'गुलाबी' ट्रेण्डनुसार तीन प्रकारच्या युनिक साड्या गिफ्ट म्हणून द्या. गुलाबी साडी पाहून आई नक्कीच खुश होईल(Mother's Day Special 2024 : Saree For Mother For Gift).

गुलाबी साडी आणि लालीलाल..

ऑर्गेंजा साडी

आई स्वतःकडे कमी आणि घरच्यांचा विचार जास्त करते. अशावेळी आजच्या दिवशी आई सुंदर आणि खास दिसावी असं वाटत असेल तर, त्यांना ऑर्गेंजा साडी भेट म्हणून आपण देऊ शकता. आजकाल ऑर्गेंजा साडी खूप ट्रेण्डमध्ये आहे. सध्या गुलाबी साड्यांचा देखील ट्रेण्ड आहे. आपण त्यांना गुलाबी रंगाची साडी गिफ्ट म्हणून देऊ शकता. या साडीला प्रिंट वर्क असून सिल्क फॅब्रिकमध्ये आहे. या साडीमध्ये आपल्याला अनेक रंगाचे पर्याय मिळतील. ही साडी ऑनलाइन खरेदी केल्यास आपल्याला ४६० रुपयात मिळेल.

खाण्याच्या सवयींमुळे भारतीय आजारी पडतात! ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं, सतत आजारपण नको तर..

Click to Buy :-Organza Saree

बनारसी कॉटन सिल्क साडी

प्रत्येक महिलेला कॉटनच्या साड्या प्रचंड आवडतात. यामुळे रॉयल लूक मिळतो. मदर्स डेच्या निमित्ताने आपण आईला बनारसी कॉटन सिल्क साडी भेट म्हणून देऊ शकता. गुलाबी रंगाची बनारसी कॉटन सिल्क साडी, कोणत्याही महिलेवर शोभून दिसेल. याचे फॅब्रिक कॉटन सिल्क आणि लाईट वेट आहे. यात आपल्याला १४ रंगाचे शेड्स मिळतील. आपण आपल्या आवडीनुसार कलर निवडू शकता. ऑनलाइन या साडीची किंमत ४४९ इतकी आहे.

जेवणाचं ताट वाढलं की तुम्ही आधी काय खाता? पाहा रोजच्या जेवणात पदार्थांचा योग्य क्रम

Click to Buy : - Banarsi Cotton Silk Saree

पैठणी सिल्क ब्लेण्ड साडी

महिलांसाठी पैठणी साडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. पदरावरती नाचणारा मोर कोणाला नाही आवडत. आपण मदर्स डे निमित्त आईला  पैठणी सिल्क ब्लेण्ड साडी भेट म्हणून देऊ शकता. या साडीची बॉर्डर सोनेरी असून, गुलाबी रंगात आई एखाद्या गुलाबाप्रमाणे दिसेल. याचं फॅब्रिक सिल्क ब्लेण्ड आहे, व लाईट वेट असल्याकारणाने कॅरी करण्यास अडचण येणार नाही. या साडीमध्ये ७ रंग उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवडीच्या रंगानुसार साडी खरेदी करू शकता. ऑनलाइन या साडीची किंमत ४७९ इतकी आहे.

Click to Buy :- Paithani Silk Blend Saree

Web Title: Mother's Day Special 2024 : Saree For Mother For Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.