Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सेलिब्रिटी मिरवतात म्हणून तुम्हीही दाखवत फिरू नका लव्ह बाईट, भयंकर इन्फेक्शनचा धोका.. जीवावरही बेतू शकतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:36 IST

1 / 7
Love Bite Side Effect : कपल्समध्ये प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यातीलच एक पद्धत म्हणजे 'लव्ह बाईट'. पाहायला गेलं तर शरीरावर ही एक छोटीशी खूण दिसते. पण आनंद देणारा पार्टनरचा हा रोमँटिक अंदाज कधी कधी महागातही पडू शकतो. 'लव्ह बाईट' हा तसा फारच नाजूक विषय आहे. तो लपवण्याचा प्रयत्न सगळेच करतात. जर त्यावर कुणाची नजर पडली तर हलकीशी मजेदार कुजबूजही सुरू होते. पण हाच लव्ह बाईट कधी कधी गंभीर रूप घेऊ शकतो. मानेच्या आजूबाजूच्या नसा फारच नाजूक असतात आणि त्यांवर फार जास्त दबाव पडत असेल तर हा प्रकार जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे रोमान्स करताना आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की, पार्टनरला यासाठी कधी आणि का रोखलं पाहिजे. जेणेकरून गंभीर स्थिती उद्भवू नये. अशात लव्ह बाईटने काय काय समस्या होऊ शकतात, हे पाहुयात.
2 / 7
मानेची त्वचा, मानेच्या नसा फारच संवेदनशील आणि नाजूक असतात. जेव्हा पार्टनर त्यावर चावा घेतो किंवा त्वचा खेचतो तेव्हा त्वचेखालील नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. जर या गाठी रक्तप्रवाहासोबत मेंदूपर्यंत पोहोचल्यास, रक्तप्रवाह खंडीत होऊ शकतो. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
3 / 7
अनेक केसेसमध्ये असं आढळून आलंय की, लव्ह बाईटमुळे व्यक्तीला स्ट्रोक आलाय. मुळात जेव्हा मानेच्या कॅरोटिड आर्टरीवर जास्त दबाव पडतो, तेव्हा त्या ब्लॉक होतात. ज्यामुळे मेंदूला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही आणि याच कारणाने व्यक्तीला अचानक स्ट्रोक येतो.
4 / 7
मानेच्या दोन्ही बाजूला मुख्य धमण्या असतात, ज्या मेंदूपर्यंत रक्त पुरवण्याचं काम करतात. लव्ह बाईट घेताना दात किंवा ओठांच्या फार जास्त दबावामुळे या धमण्यांच्या आतील थराचं नुकसान होऊ शकतं. ही एक गंभीर मेडिकल स्थिती ठरू शकते.
5 / 7
आपल्याला विश्वास बसणार नाही, पण अशाही केसेस समोर आल्या आहेत की, लव्ह बाईटनंतर क्लॉट तयार झाल्याने म्हणजे रक्ताच्या गाठी तयार झाल्याने अर्ध्या शरीराला लकवा मारला गेलाय.
6 / 7
जर आपल्या पार्टनरला ओरल हर्पीज असेल, तर लव्ह बाईटच्या माध्यमातून तो व्हायरस आपल्या त्वचेमध्येही पसरू शकतो.
7 / 7
उत्साहाच्या भरात मानेच्या खास भागावर जास्त दबाव पडल्याने हार्ट रेट आणि बीपी अचानक कमी होऊ शकतो. या स्थितीत व्यक्ती बेशुद्ध देखील पडू शकतो.
टॅग्स : लैंगिक जीवनत्वचेची काळजीहेल्थ टिप्स