1 / 6हिवाळ्यातल्या थंड वातावरणाचा त्रास होत असल्याने घरोघरी मुलं आजारी पडतात. काही अपवाद सोडले तर बहुतांश मुलांना या दिवसांत सर्दी, खोकला, छातीत कफ होणे असा त्रास होतो (how to improve immunity of kids in winter?). मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना हवेतला गारवा सहन हाेत नाही.(food that helps to boost immunity in kids)2 / 6म्हणूनच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मुलांना काही पदार्थ हिवाळ्यात आवर्जून खाऊ घालावे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..(winter super food for kids) 3 / 6पहिला पदार्थ आहे सुकामेवा. बदाम, अक्रोड, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, मनुका असा सगळा सुकामेवा मुलांना थंडीमध्ये मुलांना खायला द्या. यामुळे शरीराला आवश्यक पौष्टिक घटक मिळतात तसेच शरीर उबदार राहण्यास मदत होते. सुकामेवा मुलांनी नुसता खाल्ला तरी चालेल. किंवा मुलं तसा खात नसतील तर त्याचे लाडू, चिक्की, मिल्कशेक बनवून तुम्ही त्यांना खायला देऊ शकता.4 / 6हिवाळ्यात मेथी, पालक, गाजर, मुळा, रताळी, मटार या फ्रेश भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. या भाज्या टाकून पराठे करा आणि ते भरपूर तूप लावून मुलांना खायला द्या. 5 / 6थंडीच्या दिवसांत शरीर उबदार ठेवण्यासाठी मुलांना तीळ-गुळाची चिक्की किंवा लाडू खायला देणेही फायदेशीर ठरते.6 / 6या दिवसांत मिळणारे डाळिंब, स्ट्रॉबेरी, पेर ही फळंही मुलांना आवर्जून खायला द्या. यातून मुलांना भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. अशी माहिती आहारतज्ज्ञांनी schweta.happyminds या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.