Join us

Exams : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षाकाळात मुलांना खाऊ घाला ८ फळं, आळस पळेल-मिळेल एनर्जी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 19:29 IST

1 / 10
सध्या दहावी - बारावीच्या परीक्षांचे दिवस सुरु आहेत. या दिवसांत विद्यार्थ्यांनी आहाराची विशेष ( Students preparing for exams should eat this 8 fruits for more energy) काळजी घेणे आवश्यक असते. सकाळचा नाश्ता संपूर्ण दिवसाला लागणारी ऊर्जा आणि ताजेपणा मिळवून देण्यास मदत करतो. यासाठीच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी योग्य, सकस आणि संपूर्ण (What kind of fruits to eat before an exam ) आहार घेतला पाहिजे.
2 / 10
बरेचदा अभ्यास करून थकवा येतो यासाठी इन्स्टंट (The Top 8 Fruits For Studying & Exam) एनर्जी मिळवून देण्यासाठी आहारासोबतच फळं खाणं देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठीच विद्यार्थ्यांनी नाश्त्यात या ८ फळांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण तर मिळतेच, शिवाय संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा आणि ताजेपणा देखील मिळण्यास मदत होते.
3 / 10
सफरचंदांमध्ये फायबर, व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनसंस्था मजबूत होऊन शरीराला ताजेपणा मिळण्यास अधिक मदत होते.
4 / 10
केळी हे पोटॅशियमचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. जे शरीराच्या स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. केळं इन्स्टंट एनर्जी मिळवून देण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. भरपूर तास अभ्यास केल्यानंतर दिवसभराचा येणारा थकवा दूर करण्यासाठी आपण केळं खाऊ शकता.
5 / 10
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. संत्रे रसयुक्त फळं असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते. परीक्षेच्या दिवसांत हायड्रेटेड राहणे देखील तितकेच गरजेचे असते. यासाठी संत्र्यांसारखी रसयुक्त फळं मुलांनी भरपूर प्रमाणांत खावीत.
6 / 10
अननसात ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, जे पचनक्रियेचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते. हे फळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास उपयुक्त ठरते. परीक्षेदरम्यान मुलांची पचनक्रिया चांगली राहावी जेणेकरून पोटाशी संबंधित कोणतेही आजार होणार नाहीत यासाठी अननस खावे.
7 / 10
किवीमध्ये व्हिटॅमिन 'सी' चे प्रमाण जास्त असते. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच ते रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित करते.
8 / 10
ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. याचबरोबर मेंदूची कार्ये देखील अगदी सुरळीतपणे चालण्यास मदत करतात एवढेच नव्हे तर मानसिक आरोग्य सुधारण्यास किवी खाणे उपयुक्त ठरते.
9 / 10
द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात.
10 / 10
पपई खाल्ल्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असे शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंफळे