By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 01:01 IST
1 / 7आर माधवन हा बॉलिवूडमधील एक अत्यंत सुजाण आणि अभ्यासू अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं मुलांच्या संगोपनाबाबत मांडलेले विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (R Madhavan Shares A Parenting Advice)2 / 7 माधवनच्या मते मुलांसोबत फक्त ठराविक वेळ क्लालिटी टाईम म्हणून घालवणं ही एक पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीय संस्कृतीत आपण मुलांसोबत सहज राहतो. (R Madhavans Different Approach To Quality Time)3 / 7 दिवसातील काही तास वेगळे काढून मुलांशी बोलण्यापेक्षा त्यांच्यासोबत राहणे आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनवणं महत्वाचे आहे.4 / 7 मुलांना सतत उपदेश करण्यापेक्षा पालक स्वत:कसे वागतात याकडे मुलं जास्त लक्ष देतात. त्यामुळे स्वत:चे वागणे आदर्श ठेवण्यावर त्यानं भर दिला आहे.5 / 7माधवनचा मुलगा वेदांत हा एक यशस्वी जलतरणपटू आाहे. माधवने त्याला अभिनयात येण्यासाठी कधीच सक्ती केली नाही. तर त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला पूर्ण पाठिंबा दिला.6 / 7मुलांशी संवाद इतका मोकळा असावी की त्यांना कोणतीही गोष्ट सांगताना भिती वाटू नये. पालक असण्यापेक्षा मार्गदर्शक असण्यावर त्याचा विश्वास आहे.7 / 7 शिस्त महत्वाची आहे. पण ती लादलेली नसावी. मुलाला स्वत:च्या चुकांमधून शिकण्याचे स्वातंत्र्या द्यायला हवे.