४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

Published:September 8, 2023 04:16 PM2023-09-08T16:16:22+5:302023-09-08T16:22:26+5:30

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना काय शिकवावं आणि काय शिकवू नये, हे ठरलेलं असतं. सध्याच्या एवढ्या धावपळीच्या जगात मुलांनी मागे पडू नये, म्हणून त्यांना ठराविक वयात ठराविक गोष्टी शिकवल्याच पाहिजेत.

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

म्हणूनच वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी माहिती असायलाच हव्यात, याविषयी ही खास माहिती. ही माहिती बालरोगतज्ज्ञांनी dr.arpitgupta11 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

मुलांची कितीही काळजी घेतली तरी मुलं कधीतरी चुकून पालकांचा हात सोडतात आणि हरवतात. अशा घटनेचा अनुभव एकतर आपण स्वत:तरी घेतलेला असतो किंवा कुणा जवळच्या व्यक्तीकडून तरी ऐकलेला असतोच. आपल्याही पाल्यासोबत असं होऊ नये म्हणून अगदी साडे- तीन, चार वर्षांच्या मुलांकडून पुढील गोष्टी तोंडपाठ करून घ्या.

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

यातली सगळ्यात पहिली माहिती म्हणजे मुलांना त्यांचं पुर्ण नाव सांगता यायला हवं

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना त्यांच्या दोन्ही पालकांचं म्हणजेच आईचं आणि बाबांचं पुर्ण नाव सांगता यायला पाहिजे.

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

तिसरा मुद्दा म्हणजे मुलांकडून त्यांच्या दोन्ही पालकांचा मोबाईल नंबर तोंडपाठ करून घ्या.

४ वर्षांच्या मुलांनाही माहितीच हव्या ४ गोष्टी, मुलांना सुरक्षित ठेवायचं तर पालकांनी काय सांगायला हवं..

आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना त्यांच्या घराचा पत्ता माहिती असायलाच हवा. कधी गर्दीत मुलं तुमच्यापासून नकळतपणे दूर झाली तर त्यांनी दिलेली वरील माहिती त्यांना पुन्हा तुमच्यापर्यंत सुखरूप पोहोचवू शकते.