मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

Updated:March 31, 2026 22:00 IST2026-03-31T22:00:00+5:302026-03-31T22:00:02+5:30

habits to teach children before age 10 : how to teach kids discipline and responsibility : लहानपणीच योग्य वयात मुलांना लावा या खास १० चांगल्या सवयी... आयुष्यभर होईल फायदा...

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

मुलांचे संगोपन करताना त्यांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे केवळ त्यांचे शारीरिक आरोग्यच सुधारत नाही, तर ते मानसिकदृष्ट्याही अधिक खंबीर बनतात. तुमचे मूल जर १० वर्षांचे होणार असेल, तर त्याआधीच त्यांना 'या' १० गोष्टींची सवय लावणं गरजेचं असतं...जेणेकरून मोठे झाल्यावर त्यांना या गोष्टींचा फायदा होईल आणि ते आपल्या पालकांचे मनापासून आभार मानतील(parenting tips for raising disciplined kids).

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

अनेकदा पालक शिस्तीच्या नावाखाली मुलांवर इतकी बंधनं घालतात की, नकळत त्यांची ऊर्जा आणि आत्मविश्वास दाबला जातो. मूल जेव्हा ४ ते ५ वर्षांचे होऊ लागते, तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये उत्साहाने जगण्याची सवय विकसित करणे गरजेचे आहे. मुलांना नेहमी हसून आणि उत्साहाने बोलायला शिकवा. जेव्हा एखादं मूल आनंदाने आपले विचार मांडतं, तेव्हा त्याच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो. प्रत्येक वेळी उदास राहणे, कोणत्याही कामात रस न दाखवणे किंवा सतत गप्प राहणे, या गोष्टी मुलांमध्ये केवळ 'नकारात्मक ऊर्जा' (Negative Energy) निर्माण करत नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वासही कमी करतात. मुलांनी छोट्या गोष्टी केल्या तरी त्यांचे कौतुक करा. घरात आनंदी वातावरण ठेवा, जेणेकरून मूल स्वतःहून व्यक्त होईल. मुलांना प्रश्न विचारू द्या आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आनंदाने द्या.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

अनेकदा पालक आपल्या मुलांवरील प्रेमापोटी किंवा चांगल्या संगोपनाच्या नावाखाली त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी 'नाही' म्हणत नाहीत. मुलाने जे मागितलं ते लगेच हजर केलं जातं. पण, यामुळे मुलं हळूहळू जिद्दी आणि हट्टी बनू लागतात. मुलांना 'नाही' ऐकण्याची सवय लावल्यामुळे ती केवळ समजूतदार बनत नाहीत, तर मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर, शांत आणि संयमी बनतात. बाहेरच्या जगात प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, याची जाणीव त्यांना घरूनच करून द्या. एखाद्या गोष्टीला 'नाही' म्हणताना त्यामागचे योग्य कारण मुलाला शांतपणे समजावून सांगा.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

मुले साधारणतः थोडी जास्त चंचल असतात आणि त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. या ऊर्जेचा योग्य वापर करून आपण त्यांना शांत, एकाग्र आणि बुद्धीने तल्लख करु शकतो. मुलांना दररोज किमान १० ते २० सेकंद डोळे मिटून शांत बसायला सांगा. डोळे मिटून शांत बसल्याने मुलांची विखुरलेली एकाग्रता वाढण्यास मदत होते, ज्याचा फायदा अभ्यासात होतो. ही सवय मुलांना भविष्यात 'ध्यान' करण्यासाठी तयार करते, ज्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खंबीर बनतात. अतिचंचल मुले यामुळे शांत व्हायला शिकतात आणि आपली ऊर्जा योग्य कामात लावतात.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

मुलांच्या उत्तम संगोपनात त्यांना स्वावलंबी बनवणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. जेव्हा मुल ७ ते ८ वर्षांचे होऊ लागते, तेव्हापासूनच त्याला स्वतःची छोटी-मोठी कामे करण्याची सवय लावायला हवी. ही छोटीशी वाटणारी सवय मुलांना भविष्यात कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करण्यास तयार करते. जेव्हा एखादे मूल स्वतःचे काम पूर्ण करते, तेव्हा त्याच्यामध्ये 'मी हे करू शकतो' ही भावना निर्माण होते, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. स्वतःचे कपडे स्वतः धुतल्यामुळे मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळते आणि ते अधिक जबाबदार बनतात.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

आजकालची मुले एक क्षणही रिकामी बसू शकत नाहीत. त्यांना थोडा वेळ जरी कंटाळा आला किंवा 'बोर' वाटलं, तरी ते लगेच टीव्ही, मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सचा आधार घेतात. पण, मुलांच्या विकासासाठी त्यांना दररोज १० ते १५ मिनिटे 'बोर' होऊ देणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा मुलं काही काळ रिकामी बसतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात नवनवीन आणि क्रिएटिव्ह कल्पना येऊ लागतात. मोबाईल किंवा टीव्ही नसल्यामुळे त्यांचे मेंदू स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधतात, ज्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढते.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लहानपणापासूनच वेळेची किंमत कळणे अत्यंत गरजेचे आहे. जर मुलांनी वेळेचे योग्य नियोजन करायला शिकले, तर ते अभ्यासात तर प्रगती करतातच, पण मानसिकदृष्ट्याही टेंन्शन फ्री राहतात. वेळेचे पालन केल्यामुळे मुलांच्या आयुष्यात एक प्रकारची शिस्त येते.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

मुलांच्या सर्वांगीण विकासात स्वच्छतेची सवय लावणं अतिशय गरजेचं आहे. मूल जेव्हा ५ वर्षांचे होऊ लागते, तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये स्वच्छतेची आणि वस्तू व्यवस्थित ठेवण्याची ओढ निर्माण करणे गरजेचे आहे. मुलांना छोट्या-छोट्या कामांतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्या. जसे की, जेवण झाल्यावर किंवा अभ्यास झाल्यावर स्वतःचे टेबल कापडाने स्वच्छ करण्याची सवय लावा. खेळणी, पुस्तके किंवा चपला वापरून झाल्यावर त्या ठराविक जागी नीट लावून ठेवण्यास सांगा. घरात पडलेला छोटा-मोठा कचरा उचलून तो डस्टबिनमध्ये टाकण्याची सवय त्यांना जबाबदार बनवते. जेव्हा मुले स्वतः साफसफाई करायला शिकतात, तेव्हा त्यांना श्रमाची किंमत कळते आणि त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण होते.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

मुलांना लहानपणापासूनच अन्नाची किंमत आणि अन्नाचा आदर करायला शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्नाची नासाडी टाळणे ही केवळ एक चांगली सवय नसून, तो एक महत्त्वाचा संस्कार आहे.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

आजच्या काळात मुलांना पैशांची किंमत कळणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी मुलांचे सर्व हट्ट लगेच पूर्ण केल्यामुळे अनेकदा त्यांना पैशांचे महत्त्व समजत नाही. म्हणूनच, लहानपणापासूनच त्यांना 'बचत' आणि 'नियोजन' या गोष्टी शिकवायला हव्यात.

मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त, होतील जबाबदार...

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात 'आदर' हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. केवळ अभ्यासात हुशार असून चालत नाही, तर समाजात वावरताना इतरांशी कसे वागावे, हे संस्कार मुलांवर १० वर्षांच्या आतच होणे गरजेचे आहे. घरातील मोठी माणसे, शिक्षक किंवा बाहेरील ज्येष्ठ व्यक्तींशी बोलताना नम्रता राखायला शिकवा आणि त्यांचे ऐकण्याची ही सवय लावा. आपल्या मित्रांशी किंवा लहान मुलांशी खेळताना भांडण न करता प्रेमाने आणि मिळून-मिसळून वागण्याचे महत्त्व पटवून द्या. कोणाला गरज असल्यास मदत करणे आणि कोणाचेही मन न दुखावणे, हे संस्कार त्यांना एक उत्तम व्यक्ती बनवतात.