By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 15:49 IST
1 / 8लहान मुलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी कॅल्शियमयुक्त आहार खूपच महत्वाचा असतो. मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास त्याच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल.2 / 8 पालक, मेथी आणि शेवग्याची पानं यांचा आहारात समावेश करा. शेवग्याच्या शेंगांचे सूप प्यायल्यानं हाडं बळकट होतात तसंच मुलांना शारीरिक विकास व्यवस्थित होतो.3 / 8 दूध, दही, पनीर आणि ताक हे कॅल्शियमचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत.यात कॅल्शियमसोबत व्हिटामीन के सुद्धा असते.4 / 8तीळ हे कॅल्शियमचा पॉवरहाऊस आहेत. बदामाची पूड दुधात घालून किंवा गुळासोबत तिळाचे लाडू करून दिल्यास ते अधिक पोषक ठरतात.5 / 8 नाचणी हे कॅल्शियमचा अत्यंत उत्तम आणि नैसर्गिक स्त्रोत आहे. त्याची लापशी किंवा डोसा मुलांना देता येतो.6 / 8संत्री केळी, पेरू या फळांमधूनही भरपूर कॅल्शियम मिळते आणि व्हिटामीन्सही मिळतात.7 / 8 नाचणीच्या पिठाचे पदार्थ, कडधान्य, ड्रायफ्रुट्स आणि सोयाबीनचा आहारात समावेश करावा.8 / 8 शरीराला कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटामीन डी ची गरज असते. त्यामुळे मुलांना थोडा वेळ सकाळ्याच्या कोवळ्या उन्हात खेळू द्या.